National Games 2023 Goa Dainik Gomantak
गोवा

National Games 2023: गोव्याच्या मिरामार समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशचा 2 खेळाडूंना दंश

ट्रायथलॉनवेळी एकाचा पाय फ्रॅक्चर

Akshay Nirmale

National Games Goa 2023: गोव्यात सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ट्रायथलॉन स्पर्धेतील दोन खेळाडूंना येथील मिरामार समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिशने दंश केल्याची घटना घडली आहे.

तर अन्य एका ट्रायथलीटला या स्पर्धेदरम्यान फ्रॅक्चर झाल्याची माहिती दृष्टी मरीन या सरकारने नेमलेल्या खासगी जीवरक्षक संस्थेने दिली आहे.

एजन्सीच्या जीवरक्षकांनी मंगळवारी जेलीफिशने दंश झालेल्या दोन ऍथलीट्सवर प्रथमोपचार केले. या खेळाडुंबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

दृष्टी मरीनने निवेदनात म्हटले आहे की, “जे जेलीफिशने दंश केलेल्या ठिकाणी व्हिनेगरच्या सहाय्याने जखमांवर उपचार करण्यात आले. जेलीफिशच्या डंखासह आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्यात येणारी अनेक साधने जीवरक्षक टॉवरमध्ये असतात.

दरम्यान, मणिपूरमधील आणखी एक 16 वर्षीय खेळाडूचा इव्हेंटदरम्यान धावण्याच्या सेगमेंटमध्ये पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याच्यावरदेखील प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर त्याला जवळील सरकारी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले.

एजन्सीकडून एकूण 16 जीवरक्षकांना राष्ट्रीय खेळांसाठी दोन बीच सेफ्टी डॉग्स आणि दोन आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चालणारे रोबोट- ऑरस आणि ट्रायटन देखील तैनात करण्यात आले आहेत.

जे क्रीडा स्पर्धांदरम्यान समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा आणि गर्दी नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे काम करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT