National Game Goa 2023 : Dainik Gomantak
गोवा

National Game Goa 2023 : राष्ट्रीय स्पर्धेसाठी रोज 1 हजार लिटर दूध, 900 किलो पनीर, 750 किलो चिकन, 800 किलो मासे!

खेळाडूंसह पाहुण्यांची खास बडदास्त : ‘शाही डायनिंग’साठी झटतात हजारो ‘हात’; शेतकऱ्यांसह अनेकांना रोजगार

गोमन्तक डिजिटल टीम

सचिन कोरडे

National Game Goa 2023 : पणजी, राज्यात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी देशभरातून १० हजारांहून अधिक खेळाडू दाखल झाले असून या स्पर्धेतील खेळाडूंसाठी आयोजकांनी खास बडदास्त ठेवली आहे. खेळाडूंना संतुलित आहार मिळावा, यासाठी रोज हजारो हात दिवसरात्र झटत आहेत.

एक वेळचा नाश्ता, दुपारची ‘हॉट टी’ आणि दोन वेळचे जेवण यांसाठी आयोजक कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. स्वयंपाकासाठी रोज ९०० किलो पनीर, ७५० किलो चिकन तर ८०० किलो मासे, १ हजार लिटर दूध, १५ हजार केळी, १,२५० किलो सफरचंद शिवाय इतरही जिन्नस वापरले जातात.

उल्लेखनीय म्हणजे, सर्व भाजी ही गोव्यातीलच असून त्यासाठी ४२ शेतकऱ्यांकडून थेट पुरवठा केला जात असल्याची माहिती ‘थॉमस कुक’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘गोमन्तक’ला दिली.

स्वच्छता आणि ‘बायोडिग्रेडेबल’ प्लेट्‌स : खेळाडूंसाठी ‘डाएट’ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे गोवा सरकारने खेळाडूंच्या आहाराबाबत कसलीही कसर सोडलेली नाही. रोज वेगळा ‘मेन्यू’ निवडण्यात येतो, ज्यात सर्व राज्यांतील खाद्यसंस्कृतीचाही समावेश आहे. याशिवाय स्वच्छतेवर खास भर देण्यात येत आहे.

खेळाडू, तांत्रिक अधिकारी तसेच मान्यवरांच्या जेवणासाठी ‘इको फ्रेण्डली प्लेटस’ (डिग्रेडेबल) वापरण्यात येत आहेत. त्या आरोग्यास हानिकारक नाहीत, तसेच त्यापासून संसर्गही होत नाही.

खेळाडूंचा फळअहार

१५ हजार केळी

१,२५० किलो सफरचंद

शेतकऱ्यांचा ‘स्वयंपूर्णते’चा संदेश

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही केवळ खेळाडूंनाच ‘बुस्ट’ देणारी ठरलेली नाही. त्यातून गोव्यातील शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळत आहे. खेळाडूंच्या ताटात वाढल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये गोव्यातील शेतकऱ्यांनीच पिकवलेल्या भाजीचा समावेश आहे.

तब्बल ४२ शेतकऱ्यांकडून हजारो किलो भाजी रोज विकत घेतली जात असून त्यातून या शेतकऱ्यांना मोठा रोजगार प्राप्त झाला आहे.

‘थॉमस कुक’ या कंपनीने शेतकऱ्यांसोबत हा करार केला असून गोव्यातील भाजीचा आस्वाद देशभरातील खेळाडू घेत आहे. ‘थॉमस कुक’च्या या संकल्पनेमुळे राज्यातील शेतकरी मात्र ‘स्वयंपूर्ण’ बनले आहेत.

स्थानिकांना रोजगार

या स्पर्धेमुळे मल्टिटास्किंग कामासाठी गोव्यातील ६०० युवक-युवतींना रोजगार मिळाला आहे. याशिवाय ७०० जण राज्याबाहेरील आहेत. खेळाडूंचा निवास, प्रवास, भोजन व इतर सुविधांसाठी खास स्वयंसेवकही नेमले आहेत.

खेळाडूंना रोज वेगवेगळ्या प्रकारचे जेवण पुरविण्यात येत आहे. खासकरून गोव्यातील फिश करी राईसही आम्हाला देण्यात आला होता. मी आयोजकांच्या सुविधेबाबत खूप समाधानी आहे.

- जोगिंदर सिंग, हरियाणा (खेळाडू)

४ ते ५ हजार रोटी

स्पर्धेत देशभरातून खेळाडू आल्याने काही खेळाडूंना भाताव्यतिरिक्त रोटी/चपातीची गरज असते. ते आपल्या ‘डाएट’वर लक्ष केंद्रीत करतात. त्यामुळे खेळाडूंसाठी रोटी/चपाती बनविली जाते. रोज जवळपास ४ ते ५ हजार रोटी बनविण्यात येत असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधीने दिली.

दिवसा १६ हजार लोकांचे भोजन

स्पर्धेतील केवळ खेळाडूंसाठीच नाश्ता, जेवण, हाय टी आणि रात्रीच्या जेवणाची सोय नसून खेळाशी संबंधित अधिकारी, तांत्रिक अधिकारी, संस्था, प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच मान्यवरांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेत रोज १६ ते १७ हजार लोकांचे जेवण बनविण्यात येत आहे. यासाठी ४१७ हून कुक आणि सर्व्हिस टीममध्ये ५२० जणांचा समावेश आहे.

दिवसा १६ हजार लोकांचे भोजन

स्पर्धेतील केवळ खेळाडूंसाठीच नाश्ता, जेवण, हाय टी आणि रात्रीच्या जेवणाची सोय नसून खेळाशी संबंधित अधिकारी, तांत्रिक अधिकारी, संस्था, प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच मान्यवरांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

स्पर्धेत रोज १६ ते १७ हजार लोकांचे जेवण बनविण्यात येत आहे. यासाठी ४१७ हून कुक आणि सर्व्हिस टीममध्ये ५२० जणांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT