National Education Policy Dainik Gomantak
गोवा

National Education Policy : राष्ट्रीय शिक्षण धोरण नववीसाठी लागू होणार? लवकरच निर्णय

National Education Policy : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारे राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

National Education Policy :

पणजी, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नवा अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्‍प्यात आली आहे, परंतु याबाबत अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारे राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यंदा नववीच्या वर्गासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम सुरू करावा किंवा नाही यासंदर्भात गेल्या १६ एप्रिल रोजी दक्षिण आणि उत्तर गोव्यातील सर्व शैक्षणिक संस्थांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून याबाबत सूचनाही मागवण्यात आल्या आहेत.

राज्यात मागील वर्षांपासून राष्टीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे. फाउंडेशन १ च्या विद्यार्थ्यांसाठी राष्टीय शिक्षण धोरण अमलात आणले आहे. यंदा फाउंडेशन २ आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्टीय शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रमाची सुरूवात करण्याचा विचार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व इयत्तांमध्ये राष्ट्रीय धोरणानुसार अभ्यासक्रमाला सुरूवात होईल, असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालक मेघना शेटगावकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने शिक्षकांना आवश्‍यक ते प्रशिक्षण तसेच मदत केली जाते. मागील वर्षी अंगणवाडी कर्मचारी तसेच शिक्षकांना मिळून सुमारे ३ हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय अभ्यासक्रम कृती आराखड्याअंतर्गत शिक्षकांसाठी काही मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. त्यांचे एक छोटे टीचर गाइड आम्ही तयार केले असून त्यानुसार कशा पद्धतीने अभ्यासक्रम राबवावा हे शिक्षकांना सांगण्यात आले आहे.

तालुकास्तरीय समित्या शाळांना भेट देऊन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने येणाऱ्या समस्या जाणून घेतात व त्यांची मदतही करतात, असे शेटगावकर यांनी सांगितले.

मास्टर्स ट्रेनर देतात प्रशिक्षण

शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया पुढेही सुरू राहणार आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देणारे सर्व शिक्षक गोमंतकीयच आहेत. त्यांना मास्टर्स ट्रेनर म्हटले जाते. या प्रशिक्षकांमध्ये प्राथमिक शाळेच्या शिक्षकांपासून प्राध्यापक देखील आहेत.

त्यांच्याद्वारे टॉय बेस्ड ट्रेनिंग, कला, संगीत तसेच इतर विषयांच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येते. येत्या काळातही आवश्‍यकतेनुसार त्यांच्याद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे शेटगावकर यांनी सांगितले.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारे यंदा राज्यातील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पाठ्यक्रम राबविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, परंतु अजून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ज्यावेळी तो घेतला जाईल त्यावेळी कळविले जाईल.

- मेघना शेटगावकर, संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Inspiring Video: 'शिकण्याची जिद्द' याला म्हणतात! शाळेत जाणाऱ्या आजीबाईंचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, "एक नंबर..."

Goa ZP Election: जि.पं. आरक्षणावर मंगळवारी सुनावणी, राज्य निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस

Horoscope: तुमचे नशीब उजळणार! व्यवसायात भरभराट! 'या' 4 राशींसाठी 17 नोव्हेंबरपासून चांगले दिवस

IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्समध्ये 'महाबदल'! आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यरसह 9 स्टार खेळाडूंना नारळ

Pimpal Tree: शेकडो वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने लावलेला, मोंहेजदाडो,- हडप्पा काळापासून सापडणार सर्वात प्राचीन वृक्ष 'पिंपळ'

SCROLL FOR NEXT