Goa SSC Board Exam Dainik Gomantak
गोवा

National Education Policy: येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी; शिक्षण सचिव लोलयेकर

Prasad Lolayekar: इयत्ता सहावी आणि दहावीला राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अमंलबजावणी; शक्य झाले तर इयत्ता सातवी आणि आठवीला होणार

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अमंलबजावणी सुरू असून पुढील टप्प्यात येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावी आणि दहावीला राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अमंलबजावणी करण्यात येणार असल्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.

दरम्यान लोलयेकर म्हणाले, जर शक्य झाले तर इयत्ता सातवी आणि आठवीला देखील राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अमंलबजाणी करण्यात येईल. यासंबंधी राज्यातील सर्व शिक्षण संस्थांशी जानेवारी महिन्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पारख राष्ट्रीय सर्वेक्षण येत्या १९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. त्या अनुंषगाने विद्यार्थ्यांची तयारी होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही स्वतः विद्यार्थ्यांची पूर्वचाचणी घेत आहोत. त्यामुळे ज्यावेळी तिसरी, सहावी आणि नववीचे विद्यार्थी प्रत्यक्ष चाचणी देतील. त्यावेळी त्यांना अडथळा येऊ नये हे उद्दिष्ट असून आम्ही विद्यार्थ्यांना तयार करत आहोत,असे लोलयेकर म्हणाले.

तालुकावार आढावा घेणार

राज्यात नवीन शिक्षण धोरण राबविताना शिक्षक,पालक, शैक्षणिक संस्थांना कोणत्या समस्या जाणवतात का हे जाणून घेण्यासाठी तालुकावार आढावा बैठका जून महिन्यात घेण्यात आल्या होत्या. तशाच बैठका या महिन्यात घेण्यात येणार आहेत व एनईपी अमंलबजावणीतील समस्या व इतर बाबी जाणून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सचिव लोलयेकर यांनी सांगितले.

संपूर्ण साक्षरतेसाठी प्रयत्नरत!

गोवा राज्य साक्षर राज्य घोषित करण्यासाठी प्रयत्नरत असून राज्यातील ज्या नागरिकांना अजून अक्षर ओळख झालेली नाही, त्यांना एससीईआरटीद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आम्ही राज्यातील २ हजार नागरिकांना यापूर्वी प्रशिक्षण दिले आहे. जर अजूनही कोणी नागरिक अक्षर ओळखीविना राहिले असतील तर त्याची माहिती देण्याचे निर्देश पंचायत संचालक आणि नगर प्रशासन संचालकांना देण्यात आले असून राज्य पूर्णतः साक्षर करण्यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचे लोलयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT