Higher Education Department: ‘दक्षता, शिस्तभंग कार्यवाही’वर प्रशिक्षण; उच्च शिक्षण संचालनालयातर्फे पर्वरीत आयोजन

Education Department: नवी दिल्ली येथील सचिवालय, प्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेचे संचालक संदीप मुखर्जी हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते
Education Department: नवी दिल्ली येथील सचिवालय, प्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेचे संचालक संदीप मुखर्जी हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते
Education Department TrainingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पर्वरी: उच्च शिक्षण संचालनालयातर्फे दि. २३ व २४ ऑगस्ट रोजी ‘दक्षता आणि शिस्तभंग कार्यवाही’ या विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम येथील कौटिल्य लेखा भवनात आयोजित करण्यात आला होता. नवी दिल्ली येथील सचिवालय, प्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेचे संचालक संदीप मुखर्जी हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

राज्यातील शासकीय, निमशासकीय महाविद्यालयातील प्राचार्यं, गोवा विद्यापीठातील अधिकारी, तसेच उच्च शिक्षण संचालनालयातील अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग, शिक्षण विभागातील अधिकारी यांच्यासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम होता. या प्रशिक्षण कार्यक्रमांचे संयोजन उच्च शिक्षण संचालनालयातील साहाय्यक संचालक अशांक देसाई यांनी केले.

यावेळी प्रा. राजेंद्र कुंभारजुवेकर, प्रा. संजय देसाई, गोवा विद्यापीठातील सिद्धी काणकोणकर, उच्च शिक्षण संचालनालयातील साहाय्यक संचालक डॉ. भक्ती नाईक यांनी विचार मांडले. उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांच्या हस्ते संदीप मुखर्जी यांना स्मृतिचिन्ह देण्‍यात आले. सूत्रसंचालन साहाय्यक भक्ती नाईक यांनी केले तर शिक्षण संचालनालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. जर्वासियो एस. एफ. एल. मेंडिस यांनी आभार मानले.

Education Department: नवी दिल्ली येथील सचिवालय, प्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेचे संचालक संदीप मुखर्जी हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते
Goa Education Department: ‘ॲक्सिस’ची सक्ती घेतली मागे; गुरुदक्षिणा योजनेबाबत निर्णय

या विषयांवर देण्यात आले प्रशिक्षण

या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात घटनात्मक तरतूद अनुच्छेद ३११, शिस्तभंग कार्यपद्घतीचे विहंगावलोकन, शिस्तपालन प्राधिकरण आणि नियुक्ती प्राधिकरणाची संकल्पना, निलंबन कधी आणि केव्हा केले जाते, आरोपपत्र आणि त्याचे प्रकार, आरोपपत्र कोण जारी करू शकते, त्यावर कोणाची सही असते, आरोपपत्राचा मसुदा, चौकशीची प्रक्रिया, चौकशी करणारे अधिकारी व त्यांची कर्तव्ये, त्‍यांच्‍या जबाबदाऱ्या, दंडाचे स्वरूप आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vaibhavi IIT success story
CRC Centre
Satya Niketan Building Collapse Delhi
Gen Z Movement India
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com