Goa Education News Dainik Gomantak
गोवा

New Education Policy: शैक्षणिक धोरणासाठी आधी शिक्षकांची कार्यशाळा! ‘प्रगतिपत्रक, प्रश्नपत्रिकेचे मानक प्रारूप’वर मार्गदर्शन

NEP Goa workshop: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षणाच्याद्वारे स्वयंपूर्ण बनवून त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अध्यापन प्रणाली सक्षम बनवणे आवश्यक आहे.

Sameer Panditrao

National Education Policy Goa

पणजी: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) राज्यात प्रभावीपणे लागू करण्याचा एक भाग म्हणून गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, दिल्ली (एनसीआरटी) यांच्या पुढाकाराने ‘सर्वांगीण प्रगति पत्रक व प्रश्नपत्रिकेचे मानक प्रारूप’ या विषयावर उद्या, ता. १० पासून ते १३ मार्चपर्यंत अशी चार दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा घेतली जाणार आहे.

माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक पातळीवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या आल्त- पर्वरी येथील प्रशस्त सभागृहात ही कार्यशाळा आयोजिली आहे.

या कार्यशाळेत राज्यभरातून सुमारे शंभर शिक्षक सहभागी होणार आहेत. त्यात प्रामुख्याने अभ्यास मंडळावर निमंत्रक या नात्याने कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकांचा अंतर्भाव असणार आहे. चार दिवसीय कार्यशाळेत संतुलीत प्रश्नपत्रिका तयार करण्याची मूलतत्त्वे व पद्धत, प्रश्नपत्रिका संरचना तसेच प्रश्नांचा आरंभ, प्रश्नांची मांडणी, गुणांकन योजना, प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि संयोजन, प्रश्नपत्रिकेचे मूल्यमापन अशा महत्त्वाच्या बाबींबाबत नामवंत शिक्षण तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

शेवटच्या चौथ्या दिवशी प्रश्नपत्रिकेचे मानक प्रारूप या विषयावर परिसंवाद होणार आहे. कार्यशाळा सकाळी ९.३० वा. सुरू होऊन ५ वाजता संपेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून गोमंतकीय विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षणाच्याद्वारे प्रज्ञावंत तसेच स्वयंपूर्ण बनवून त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अध्ययन व अध्यापन प्रणाली सक्षम बनवणे आवश्यक आहे.

यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे. यासाठी वरील कार्यशाळेच्या माध्यमातून एनईपीची राज्यस्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील नामवंत शिक्षणतज्ञांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केल्याची माहिती गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT