National Book Week  Dainik Gomantak
गोवा

National Book Week : राष्ट्रीय पुस्तक सप्ताहानिमित्त आजपासून ‘आयएमबी’त कार्यक्रम

National Book Week : उद्‍घाटन १८ रोजी दुपारी३.३० वाजता अध्यक्ष दशरथ परब यांच्या उपस्थितीत होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

National Book Week : पणजी, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी) तर्फे १८ ते २४ नोव्हेंबरपर्यंत संस्थेच्या सभागृहात राष्ट्रीय पुस्तक सप्ताह साजरा होणार आहे. उद्‍घाटन १८ रोजी दुपारी३.३० वाजता अध्यक्ष दशरथ परब यांच्या उपस्थितीत होईल.

परब यांनी पत्रकार सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. उद्‍घाटनानंतर ४ वा.''पुस्तक प्रकाशन दर्जा आणि मूल्यांकित महत्त्व'' या विषयावर गोमंतकीय प्रकाशन संस्थेचे प्रकाशकांसोबत चर्चासत्र होईल. या सप्ताहात गोव्यातील १५ पुस्तक विक्रेते व प्रकाशक सहभागी होणार आहेत.

१९ रोजी दु.३.३० वा. जी.ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या समग्र साहित्यावर चर्चासत्र होईल. या चर्चासत्रात प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, डॉ. जयप्रभू कांबळे, डॉ. प्रमदा देसाई व डॉ. स्नेहा म्हांबरे यांचा सहभाग असेल.

अध्यक्षस्थानी डॉ. सोमनाथ कोमरपंत असतील. २० रोजी सायं ४ वा. डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या पुरण या कोकणी कादंबरीवर चर्चासत्र होईल. यात गोपीनाथ गावस, दीपराज सातार्डेकर, नमन धावसकर आणि भूषण भावे यांचा सहभाग असेल. २१ रोजी दु.३.३० वा. कळंबिका कला मंच मुळगाव अस्नोडातर्फे सायं ६.३० वा. अरण्यक नाटक सादर होईल.

२२ रोजी दु.३.३०वा प्रख्यात गोमंतकीय नाट्य अभिनेत्री हिराबाई पेडणेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभिनय क्षेत्रातील गोमंतकीय अभिनेत्रींचे योगदान या विषयावर परिसंवाद होईल. यात अश्विनी जांबावलीकर, अनघा देशपांडे, डॉ. मीनाक्षी मार्टिन्स, सुचिता नार्वेकर, गौरी कामत, शोभा जाधव व रमिता गुरव सहभागी होतील.

तसेच हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी सकाळी १० वा. वक्तृत्व स्पर्धा होईल. काही ज्येष्ठ अभिनेत्रींचा यावेळी सन्मान करण्यात येईल. २३ रोजी सकाळी १०वा विद्यार्थ्यांसाठी मला आवडलेले पुस्तक या विषयावर वक्तृत्व स्पर्धा होईल.

यामध्ये मराठी कोकणी व हिंदी तील कोणत्याही पुस्तकावर विद्यार्थी भाषण करू शकतात. हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी पेंटिंग स्पर्धा ही घेण्यात येईल. २४ रोजी सकाळी १० वा. पुस्तक सप्ताहाची सांगता होईल. यावेळी संस्थेचा स्थापना दिन साजरा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

SCROLL FOR NEXT