Pramod Sawant Carlos Ferreira  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'म्हजे घरचे स्वरूप लोकांना खरी मदत करणारे नाही'! CM सावंत, कार्लोस फेरेरा एकाच मंचावर; नास्नोड्यात अर्ज वितरित

CM Pramod sawant Carlos Ferreira: आमदार कार्लुस फेरेरा यांनी यावेळी सांगितले की, आपल्या घरांना बेकायदेशीर ठरवले जाण्याच्या भीतीत जगणाऱ्या लोकांना दिलासा देण्यास ते विरोध करत नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

बार्देश: गोवा मुक्तीपासून सत्तेवर असलेल्या सरकारांकडून लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु भाजप सरकार केवळ लोकांचे हित जपणारे व त्यांच्या कार्यासाठी झटणारे सरकार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

हळदोणा मतदारसंघातील नास्नोडा पंचायतीत माझे घर योजनेअंतर्गत अर्ज वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, माजी आमदार ग्लेन टिकलो आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी माझे घर योजनेची माहिती दिली. या योजनेला उत्ंस्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या योजनेचे अर्ज वितरित करण्यात आले.

आमदार कार्लुस फेरेरा यांनी यावेळी सांगितले की, आपल्या घरांना बेकायदेशीर ठरवले जाण्याच्या भीतीत जगणाऱ्या लोकांना दिलासा देण्यास ते विरोध करत नाहीत. मात्र सध्याच्या स्वरूपातील कायदा हा लोकांना खरी मदत देणारा नाही, असे ते म्हणाले. तसेच वितरित करण्यात येणाऱ्या फॉर्मवर क्रमांक दिले असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला.

दिले जाणारे फॉर्म क्रमांकित असून कायद्यात क्रमांकित फॉर्म देण्याची कुठेही तरतूद नाही. या क्रमांकांच्या आधारे अर्जदारांची माहिती शोधली जाऊ शकते, ज्यामुळे भ्रष्टाचाराची संधी निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. जर छपाई विभाग हे फॉर्म शुल्क घेऊन विकत असेल, तर ते वेगळे प्रकरण आहे. पण या प्रकरणात फॉर्म सर्वांना मोफत मिळायला हवेत, आणि लोकांना हे फॉर्म संकेतस्थळावरून डाऊनलोड करून छापून सादर करण्याची मुभा असावी, असे ते म्हणाले.

आमदार कार्लुस फेरेरा यांनी यांनी नागरिकांना ‘माझे घर योजना’अंतर्गत अर्ज प्रक्रियेसाठी पैसे मागणाऱ्या दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. जर कोणी पैसे मागत असेल, तर मला किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला याची माहिती द्या. तसेच लहान शेतकऱ्यांवर होणाऱ्या भेदभावाचाही मुद्दा मांडला. सरकारने या शेतकऱ्यांसाठी खास विशेष सवलत देण्याची विनंती केली. गोव्यातील शेतकरी छोटे असून अनेकांनी आपल्या शेतजमिनीवर घरे बांधली आहेत. त्यांना सवलत द्यावी, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT