Narvem Ghat Aarti Project Protes Dainik Gomantak
गोवा

Narvem: स्मशान नष्ट करून आरती घाट नको, नार्वेत ग्रामस्थांची मागणी; सरकारविरोधात जोरदार निदर्शने

Narvem Ghat Aarti Project Protest: नार्वे येथील नियोजित ‘घाट आरती’ प्रकल्पामुळे तेथील स्मशानभूमीचे अस्तित्व संकटात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: नार्वे येथील नियोजित ‘घाट आरती’ प्रकल्पामुळे तेथील स्मशानभूमीचे अस्तित्व संकटात आहे. ही स्मशानभूमी जमीनदोस्त करण्याच्या हालचाली सुरु झाल्याने या स्मशानभूमीशी निगडीत असलेल्या नार्वेसह पैलतिरी असलेल्या गावात खळबळ माजली आहे. प्रकल्पासाठी स्मशानभूमी जमीनदोस्त करण्यात येईल, अशी भीतीही गावातील लोकांमध्ये पसरली असल्याने रविवारी लोक संघटित झाले. त्यांनी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.

लोकांनी आक्रमक पवित्रा घेत नार्वे येथे पंचगंगा तीरावर असलेल्या स्मशानभूमीजवळ एकत्र येत स्मशानभूमीला हात लावाल, तर खबरदार. जीव गेला तरी चालेल, स्मशानभूमी मोडण्यास देणार नाही. वेळ पडल्यास ‘घाट आरती’ प्रकल्पाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार, असा सज्जड इशारा दिवाडीसह या स्मशानभूमीशी निगडीत असलेल्या अन्य गावांतील लोकांनी दिला आहे.

नार्वे येथील स्मशानभूमी ही आमची पिढ्यान् पिढ्यांची स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीजवळ आमच्या पूर्वजांची थडगीदेखील आहे असे सांगत पिढीजात स्मशानभूमी मोडली, तर आम्ही अंत्यसंस्कार कोठे करायचे, असा प्रश्न रोहिदास नार्वेकर, सुरेंद्र वळवईकर आणि सुरेंद्र हळर्णकर यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

काळब्या देवाला साकडे

स्मशानभूमी सुरक्षित रहावी म्हणून आंदोलनकर्त्यांनी तेथील श्री काळब्या देवासमोर गाऱ्हाणेही घातले. आजच्या या निदर्शनात दिवाडी, आखाडा, वाशी, मुड्डी आदी परिसरातील मिळून शंभरहून अधिक ग्रामस्थ सहभागी झाले होते. या ग्रामस्थांनी हातात फलक घेऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या. आंदोलनकर्त्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.

११ कोटी खर्चून प्रकल्प

नार्वे येथील पवित्र तीर्थस्थळ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या पंचगंगेच्या तीरावर ११ कोटी खर्च करुण ‘गोमंत सरीता दर्शन’ अंतर्गत ‘घाट आरती’ हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रकल्पामुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेली स्मशानभूमी धोक्यात आली आहे, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

लोकांचा या प्रकल्पाला विरोध होत आहे. आपण याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आमदार प्रमेंद्र शेट यांच्याकडेही चर्चा केली आहे. बुधवारपर्यंत आम्हाला याविषयी स्पष्टीकरण मिळावे अशी आमची मागणी आहे. परंतु प्रस्तावित ठिकाणच्या प्रकल्पास आमचा विरोध राहील,

राजेश फळदेसाई, आमदार कुंभारजुवे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: एप्रिल महिन्यात अग्निपरीक्षा! 'या' राशीच्या नशिबात शनी अन् राहु-केतूचा 'डेंजर झोन'; ग्रहांची स्थिती ठरणार घातक

8th Pay Commission : पगारवाढीचा 'धमाका'! 7व्या वेतन आयोगाचे सर्व रेकॉर्ड मोडणार 8वा वेतन आयोग? महागाईला उत्तर देण्यासाठी नवा प्लॅन

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

SCROLL FOR NEXT