Narve Panchayat Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Narve Panchayat Gram Sabha: नार्वेत मेगा प्रकल्पांना ‘नो एंट्री’! ग्रामसभेच्या मान्यतेशिवाय एकाही प्रकल्पाला परवानगी न देण्याचा ठराव; पंचायतीच्या भूमिकेवर सवाल

Oppose Mega Projects Goa: मेगा प्रकल्पाच्या प्रश्नावरून नार्वे पंचायतीची झालेली ग्रामसभा काहीसी तापली. यापुढे ग्रामसभेची मान्यता घेतल्याशिवाय कोणत्याही मेगा प्रकल्पाला ग्रामसभेने परवानगी देवू नये.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: मेगा प्रकल्पाच्या प्रश्नावरून नार्वे पंचायतीची झालेली ग्रामसभा काहीसी तापली. यापुढे ग्रामसभेची मान्यता घेतल्याशिवाय कोणत्याही मेगा प्रकल्पाला ग्रामसभेने परवानगी देवू नये, असे ग्रामस्थांनी स्पष्ट करीत तसा ठरावही ग्रामसभेत घेतला. ‘एमडीआर’ अंतर्गत गावातील रस्त्यांच्या मेगा रुंदीकरणालाही ग्रामस्थांनी विरोध केला.

नार्वे पंचायतीची ग्रामसभा आज (रविवारी) सरपंच तुकाराम गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेस उन्नती पडोलकर यांच्यासह संदेश पार्सेकर सिद्धेश पार्सेकर आणि सिद्धी नाईक हे पंचसदस्य उपस्थित होते. सरपंचांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. या ग्रामसभेत रस्ते रुंदीकरणाच्या विषयावर चर्चा झाली. गावच्या लोकसंख्येचा विचार करता, सध्याचे रस्ते पूरक आहेत. असा दावा ग्रामस्थांनी करून ''एमडीआर'' अंतर्गत रस्ते रुंदीकरणाला ग्रामस्थांनी विरोध केला. ‘गंगा घाट आरती’ प्रकल्पासह बेवारस गुरांचा विषय आदी प्रश्न चर्चेत आले. माजी सरपंच लक्ष्मण मालवणकर, नामदेव मालवणकर, मिलिंद बर्वे आदी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे पंचायतीने निरसन केले. संदेश पार्सेकर यांनी आभार मानले.

घाट आरती प्रकल्प होणारच

ग्रामसभेत नार्वे गावात पंचगंगेच्या तीरावरील नियोजित गंगा घाट आरती प्रकल्प होणारच. हा प्रकल्प व्हावा. यासाठी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आग्रही आहेत. पंचायतीचाही प्रकल्पाला पाठिंबा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतीत वाद नाही, असे सरपंच तुकाराम गावडे यांनी स्पष्ट केले. नियोजित प्रकल्पाला जर व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार, असे पंचसदस्य संदेश पार्सेकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT