Road  Dainik Gomantak
गोवा

Panjim News : नार्वे फेरी धक्क्याची दुरुस्ती रखडली

नदी परिवहन खाते आक्रमक : सार्वजनिक बांधकाम खात्याला मुहूर्त मिळेना

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : मये मतदारसंघातील नार्वे येथील फेरी धक्क्याच्या दुरुस्तीला सात वर्षांत सार्वजनिक बांधकाम खात्याला (साबांखा) मुहूर्त मिळेना झाला आहे. या कामाविषयी दोनवेळा अंदाजित रक्कम बदलण्यात आली. तरीही हे काम मार्गी लागेना झाले आहे. २०१७ मध्ये या कामाची काढलेली १६ लाख ४७ हजारांची निविदा निघाली. परंतु त्यानंतर साबांखाने याच कामाची अंदाजित रक्कम गतवर्षी ४७ लाख ३१ हजारांवर नेली.

narve construction fund amount scam panajim Mayem constituencies

नदी परिवहन खात्याने त्यासही मंजुरी दिली. परंतु निविदा काढण्यावर आतापर्यंत झालेल्या चालढकलीमुळे हे काम सुरू होणार की नाही, याविषयी नार्वेतील ग्रामस्थ चिंताग्रस्त आहेत. सरकारी पातळीवरील अशा वेळकाढू धोरणाला कोण कारणीभूत आहेत, त्यांच्याविरोधात कडक कारवाईची अपेक्षा धरणेही आता चुकीचे ठरू शकते.

हाती आलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये नार्वे येथील फेरी धक्क्याची दुरुस्ती करावी म्हणून नदी परिवहन खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्रव्यवहार केला. त्यानुसार साबांखाने १५ लाख ४७ हजार ६२० रुपयांच्या खर्चाची अंदाजित रक्कम होईल, असे कळविले. त्यानुसार नदी परिवहन खात्याने ती रक्कम मंजूर केली. या रकमेच्या साबांखाने काढलेल्या निविदेनुसार, फोंडा येथील एका कंत्राटदारास ते काम मिळाले. चार वर्षे झाले तरी साबांखाने त्या कामाविषयी काहीच हालचाल केली नाही.

वारंवार निविदा काढूनही कामास दिरंगाई

येथील स्थानिक लोकांच्या फेरीबोट सेवेबाबात व्यवस्थापनाकडे तक्रारी वाढू लागल्यामुळे त्याची दखल घेत नदी परिवहन खात्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे त्या कामाविषयी विचारणा केली होती. अखेर साबांखाने संबंधित कंत्राटदाराला २ फेब्रुवारी २०२१ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर सप्टेंबर २०२२ मध्ये या कामाची साबांखाने पुन्हा एकदा सुधारित रक्कम नदी परिवहन खात्याला कळविली.

त्या सुधारित रकमेनुसार ३७ लाख २८ हजार ३५७ रुपये नदी परिवहनकडून मंजूरही झाले. जानेवारी २०२३ मध्ये पुन्हा एकदा साबांखाने या दुरुस्ती कामाची अंदाजित वाढीव रक्कम ४७ लाख ३१ हाजर ५२२ रुपये होतील असे कळविले. तेही नदी परिवहन खात्याने मंजूर केले. वारंवार सुधारित अंदाजित रक्कम देण्याचे नदी परिवहन खात्याने मंजूर करूनही साबांखाकडून काम सुरू झालेले नाही.

अखेर नदी परिवहन खात्याने साबांखाला जुलै २०२३ मध्ये पत्रव्यवहार करून दिलेले काम पूर्ण होत नसेल आणि प्रवाशांचे हित पाहता आम्हाला कारवाई करावी लागेल, असा स्पष्ट इशाराच दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT