narkasur goa  Dainik Gomantak
गोवा

Narkasur in Goa: नरकासुर स्पर्धेत राडा! काणकोणात मिरवणुकीच्या रस्त्यावरून दोन गट भिडले; जोरदार हाणामारी

Narkasur competition clash Goa: काणकोण तालुक्यातील माशे येथे आयोजित नरकासुर स्पर्धेत मिरवणुकीच्या मार्गावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना

Akshata Chhatre

काणकोण: गोव्यातील दिवाळी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, काणकोण तालुक्यातील माशे येथे आयोजित नरकासुर स्पर्धेत मिरवणुकीच्या मार्गावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या वादानंतर पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत दोन सहभागींना ताब्यात घेतले.

नरकासुराच्या मिरवणुकीत वाद

मिळालेल्या माहितीनुसार, नरकचतुर्दशीच्या निमित्ताने आयोजित नरकासुर मिरवणुकीच्या मार्गावरून पुढे जाण्यावरून सहभागींमध्ये वाद झाला, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.या प्रकरणी लोलीये येथील रॉनी फर्नांडिस आणि पैंगिण येथील राजेंद्र चारी या दोन सहभागींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी या दोन्ही व्यक्तींना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर, त्यांना जामानावर सोडण्यात आले आहे. नरकासुर स्पर्धेच्या उत्साहादरम्यान झालेल्या या वादानंतर स्थानिक प्रशासनाने पुन्हा एकदा आयोजकांना शांतता आणि नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

गोव्यातील नरकासुर म्हणजे काय?

संपूर्ण गोव्यात दिवाळीच्या काळात जर सर्वाधिक उत्साह कशाचा असतो, तर तो म्हणजे नरकचतुर्दशीच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या नरकासुर दहनाचा. वाड्यांवर, घराघरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणीसुद्धा नरकासुराचे दहन केले जाते, तसेच ठिकठिकाणी स्पर्धा आणि भव्य मिरवणुकांचे आयोजन केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT