Narendra Sawaikar on Shruti Prabhugaonkar Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: ''श्रुती भाजपची कार्यकर्ता असू शकते पण तिच्या गुन्ह्यांमुळे...''; सावईकर स्पष्टच बोलले

Narendra Sawaikar on Shruti Prabhugaonkar: श्रुती ही भाजपची एक कार्यकर्ता असू शकते मात्र तिच्या गुन्ह्यांमुळे संपूर्ण पक्ष वाईट ठरत नाही

Akshata Chhatre

BJP’s General Secretary Naredra Sawaikar on Cash For Job Scam

गोवा: सध्या गोव्यात गाजणारं सर्वात मोठं प्रकरण म्हणजे पैसे देऊन नोकरी मिळवणे किंवा कॅश फॉर जॉब स्कॅम. या प्रकरणात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सामान्य गोमंतकीयांना फसवण्याचे प्रकार घडले. दिवसेंदिवस पोलीस अशा अनेक फसव्या चेहऱ्यांना हुडकून काढत आहेत आणि एकूण प्रकरणात सध्या श्रुती प्रभुगावकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कॅश फॉर स्कॅम प्रकरणात अटक झालेल्या श्रुती प्रभुगावकर हिचे भारतीय जनता पक्षासोबत कनेक्शन आढळून आले आहे आणि यावर भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी मोठं विधान केलं आहे.

नरेंद्र सावईकर यांच्या म्हणण्यानुसार, भाजपामध्ये जवळपास १० लाख कार्यकर्त्यांचा समावेश आहे, पैकी गोव्यात भाजपचे ३.५ लाख कार्यकर्ते आहेत. श्रुती ही भाजपची एक कार्यकर्ता असू शकते मात्र तिच्या गुन्ह्यांमुळे संपूर्ण पक्ष वाईट ठरत नाही.

गटातील एक व्यक्ती जर का चूक करताना आढळला तर त्याला निष्कासित केलं जातं आणि भाजप हा एक राजकीय पक्ष आहे आणि म्हणूनच चुकीच्या गोष्टींविरोधात कारवाई केली जाईल.

श्रुती प्रभुगावकर भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ता होती मात्र आता तिचा पक्षासोबत काहीही संबंध नाही. यापुढे देखील कॅश फॉर जॉब प्रकरणात पक्षातील एखाद्याचा संबंध आढळून आला तर त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार केली जाईल. या प्रकरणात सरकार किंवा पोलिसांकडून कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही नरेंद्र सावईकर म्हणाले.

कोण आहे श्रुती प्रभुगावकर?

मंगळवारी (दि. १२ नोव्हेंबर) रोजी समोर आलेल्या माहितीनुसार सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित श्रुती प्रभुगावकरला फोंडा पोलिसांनी अटक केल होती.

श्रुती प्रभुगावकर हिला अटक करण्यापूर्वी पोलिसांनी तिच्या नावे लुकआउट नोटीस देखील जारी केली होती. श्रुती प्रभुगावकर ही गोव्यातील भाजपच्या युवा मोर्चाची माजी पदाधिकारी असून तिचे एका बेड्या मंत्र्याच्या 'पीए'सोबत कनेक्शन असल्याची देखील माहिती मिळाली होती.

प्रिया यादवचे गुन्हे मोजून संपेनात!!

कॅश फॉर जॉब स्कॅममध्ये सामील असलेल्या प्रिया यादव हिच्या विरोधात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची शृंखला अजून संपण्याचं नाव घेत नाहीये. मंगळवार (दि. १२ नोव्हेंबर) रोजी प्रिया यादवच्या विरोधात डिचोली पोलीस ठाण्यात आणखीन एक तक्रार नोंदवण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

Ranji Trophy 2024: वाल्लोर! रणजीत गोव्याचा दमदार विजय; एक डाव, 551 धावांनी अरुणाचलवर मात

Goa CBI Raid: पणजीत लाच घेताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला CBI नं रंगेहात पकडलं

Goa News: गोव्याच्या किनारी फोटोग्राफी भोवली, बिहारच्या तरुणाकडून 25 हजार दंड वसूल; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT