BJP Leader Narayan Rane
BJP Leader Narayan Rane  Dainik GOmantak
गोवा

देशात पुन्हा भाजपचेच सरकार येणार: नारायण राणे

दैनिक गोमन्तक

मोरजी: देशातील भाजपचे सरकार सक्षम असून याही पुढे देशात भाजपचेच सरकार येणार आहे शिवाय महारास्ट्र राज्यात जो दौऱ्यावेळी उदंड प्रतिसाद मिळतो त्यावरून राज्याराज्यात भाजपचे सरकार येईल असा विश्वास केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी ह्णखणे पेडणे येथे स्थानिक पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. केंद्रीयमंत्री पूर्ण महाराष्ट्र राज्यदौऱ्यावर जनसंपर्क मोहिमेच्या अतर्गत 29 रोजी मंत्री राणे दोडामार्ग येथे दौरा केल्यानंतर ह्णखणे मार्गे पेडणे न्ह्यबाग मार्गे सातार्डा दौऱ्यावर जात असताना हणखणे येथे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व त्यांच्या भाजपा सर्मर्थकानी जोरदार स्वागत केले.

यावेळी शेकडो वाहने केंद्रीयमंत्री नारायण राणे याच्या दिमतीला उपस्थित होती . हणखणे येथे तीन वाजल्यापासून भाजपचे कार्यकर्त्ये उपस्थित होते चार वाजता मंत्री नारायण राणे येणार होते ते साडे पाच वाजता पोचले तरीही लोकांच्या उत्साह कायम होता. स्वागतासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर , जिल्हा सदस्य सीमा खडपे, मनोहर धारगळकर, पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुलसीदास गावस, चंदेल सरपंच संतोष मलिक, प्रकाश कांबळी, माजी सरपंच सुर्यकांत तोरस्कर , नारायण तळकटकर, माजी सरपंच मंदार परब, प्रदीप कांबळी,संदीप नाईक, रामा सावळ देसाई, बाबी तिरोडकर , व कार्यकर्त्ये मोठ्या संखेने उपस्थित होते.

मंत्री नारायण राणे हे हणखणे येते पोहोचताच जल्लोषाने त्याचे स्वागत केले. वाहनाकडून 10 मीटरपर्यंत ते सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून चालत आले. महिलांनी आरती ओवाळून पुष्पांजली वाहून जोरदार स्वागत केले, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले. उपस्थितांचे स्वागत स्वीकारून केंद्रीयमंत्री लगेच आपल्या वाहनाकडे रवाना झाले, वाहनात बसतानाच प्रस्तून प्रतिनिधीने त्याना प्रश्न विचारले , दौऱ्याचे प्रायोजन काय ,त्यावर उत्तर देताना केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना तळागाळातील नागरिकापर्यंत पोचाव्यात, त्या पोचतात कि नाही, काही अडचणी समस्या आहेत का, शिवाय आपल्याकडे जी प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी दिली, त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र जनतेकडून आशीर्वाद घेण्यासाठी आपण पूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करत आहे, आपणास उदंड प्रतिसाद मिळत असल्याने आगामी काळातही देशांत आणि प्रत्येक राज्यात भाजपचे सरकार येईल असा विश्व व्यक्त केला.

आपण भारावून गेलो

महाराष्ट्र राज्यात आपल्याला उदंड प्रतिसाद मिळतो, शिवाय आपण 10 वीस मिनिटासाठी गोव्यात आलो तर तिथे आपले जंगी स्वागत केले गोवेकरांच्या प्रतिसादाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आगामी काळात भाजपचेच सरकार ; उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा सहभाग झाल्यानंतर त्यांनी धावत्या दौऱ्यात आमच्या पेडणे मतदार संघातील हणखणे या भागात आल्यानंतर आम्ही त्यांचे जय्यत स्वागत केले. नारायण राणे सारख्या नेत्यांची राज्यात गरज असल्याचे सांगितले. आगामी काळातही भाजपचेच सरकार येणार असे बाबू आजगावकर यांनी विश्वास व्यक्त करून मोठ्या संखेने कार्यकर्त्ये उपस्थित होते म्हणून त्यांनी सर्वांचे आभार मानले.

सामाजिक अंतर कुणासाठी? पत्रकारांचा प्रश्न

एका बाजूने मोठ्या प्रमाणात कोरोना महामारी आहे, आणि सरकारने सामाजिक अंतर राखण्यासाठी नियम केले आहे. हे नियम सर्वसामान्य नागरिकाना आहे का असा सवाल करून राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठी शेकडो नागरिक कोणतेच शाररीक अन्तर न ठेवता गर्दी केली जाते , हा कायदा सर्वसामान्याना सरकारला लागू होत नाही हा असा सवाल उपस्थित केला असता, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी उत्तर देताना कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहे, ज्यांनी दोन डोस घेतले नाही त्यांनी ते घ्यावेत , या वेळी ज्यांनी दोन डोस घेतले तेच नागरिक उपस्थित होते असा दावा केला. यावेळी मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : भाजप सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनीच दाखवला मुख्यमंत्र्यांना आरसा : युरी आलेमाव

Ponda Hospital : फोंडा इस्पितळात ऑगस्टपर्यंत सुविधा पुरवा: विजय सरदेसाई

‘’...सहमतीने संबंध ठेवणे चुकीचे म्हणता येणार नाही’’; HC ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Labor Day 2024 : कचरा गोळा करणाऱ्या कामगारांना कामगार दिनानिमित्त ‘लंच पॅकेट्स’

SCROLL FOR NEXT