Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : नानोडे चिरेखाणीवर आंघोळ कराल, तर खबरदार; डिचोली पोलिसांची सूचना

Bicholim News : धोक्याचा इशारा देणारा उभारला फलक

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, आंघोळीसाठी जीवघेण्या ठरलेल्या नानोड्यातील ‘त्या’ चिरेखाणीत यापुढे कोणी आंघोळ करताना आढळून आल्यास, त्यांच्या विरोधात आता कडक आणि कायदेशीर कारवाई अटळ आहे, तसा इशारा देणारा सूचना फलक डिचोली पोलिसांनी या चिरेखाणीवर लावला आहे.

स्थानिक पंच सदस्य दिलीप वरक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक युवकांनी आज चिरेखाणीवर स्वच्छता मोहीम राबवली. गेल्या रविवारी एकाच दिवशी नानोडे भागात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाला होता. भटवाडी - नानोडे येथील चिरेखाणीत एका मुलाचा बुडून अंत झाला होता.

दोन मुलांचा बुडून मृत्यू होण्याच्या नानोड्यातील दुर्दैवी घटनेनंतर सरकारी यंत्रणा जागी झाली. धोकादायक जलस्रोतांवर आंघोळीसाठी बंदी घालणारा आदेशही जारी करण्यात आला, तर नानोडे भागातील जलस्रोतांवर यापुढे कोणी आंघोळ करताना आढळून आल्यास, त्यांना अटक करा.

असे निर्देश आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी गेल्या बुधवारी डिचोलीत पार पडलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन बैठकीवेळी पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. आंघोळ करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारी सूचनाही फलकावर नमूद करण्यात आली आहे.

चिरेखाणीवर साफसफाई

आंघोळीसाठी असुरक्षित असलेल्या नानोडेतील ‘त्या’ चिरेखाणीवर मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक आदी कचरा साचला होता. पंच सदस्य दिलीप वरक आणि स्थानिक युवकांनी आज (रविवारी) चिरेखाणीवर स्वच्छता मोहीम राबवली.

चिरेखाणीवर अस्ताव्यस्त पडलेल्या मद्यासह प्लास्टिक बाटल्या आदी कचरा गोळा करून साफसफाई केली. चिरेखाणीवर सूचना फलक लावल्याबद्दल दिलीप वरक यांनी समाधान व्यक्त करून पोलिसांनी अधूनमधून गस्त चालूच ठेवावी, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Petrol Diesel Supply Status: पेट्रोल पंपांवर दुसऱ्या दिवशीही रांगा! राज्यात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचा इंडियन ऑईलचा निर्वाळा

Team India Cricket Schedule: BCCI चा धमाका! टीम इंडियाचं 2026-27 मधील देशातील हंगामाचं वेळापत्रक जाहीर; 17 शहरात रंगणार 22 सामन्यांचा थरार

Israel US Iran War: इराणला मोठा झटका! इस्रायली हल्ल्यात IRGC नौदल प्रमुख अलीरेझा तांगसिरी यांचा मृत्यू; होर्मुझच्या खाडीत तणाव शिगेला

Petrol Diesel Price Hike: इंधन दरवाढीचा सामान्यांना मोठा दणका! 'या' कंपनीकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत भरघोस वाढ; अफवांनी पंपांवर रांगाच-रांगा

Israel US Iran War: मध्य पूर्वेतील युद्धाच्या धामधुमीत भारताची मोठी खेळी! डॉलरची 'दादागिरी' संपवण्यासाठी रुपयाचा मास्टरस्ट्रोक; जगाचे विस्फारले डोळे

SCROLL FOR NEXT