Goa's Top News: दूधसागर, बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक, अपघात; राज्यातील ठळक बातम्या

Goa konkan Today's 31 May 2024 Breakings: गोव्यातील दिवसभरातील ठळक बातम्यांच्या अपडेट्स.
Goa's Top News: दूधसागर, बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक, अपघात; राज्यातील ठळक बातम्या

दूधसागर धबधब्यावरील बंदीचा आदेश मागे!

दूधसागर धबधब्यावरील बंदीचा आदेश मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर मागे. स्थानिक आमदार डॉ.गणेश गांवकरांनी स्थानीक जीप असोसिएशन समितीसोबत घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. या चर्चेनंतर बंदीचा आदेश मागे घेण्याचा निर्णय.

देवडी, साळकर खून प्रयत्न; आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी

अहमद देवडी आणि संदेश साळकर यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी. मंथन राजू चारी (24), श्रीधर शिवाजी किल्लेदार (26), अभिषेक रमेश पुजारी (20) कोठडीत रवानगी. तीन जण फरार.

श्रेयाच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

धोंड भक्तांच्या हस्तक्षेपामुळे श्रेया धारगळकरच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार. 3 जून (सोमवार) रोजी श्रेयाच्या जामीन अर्जावर निर्णय होणार.

हिमालयातील श्री शक्तीपीठ आई कुंजापुरी देवी मंदिराला मुख्यमंत्र्यांची भेट

हिमालयातील श्री शक्तीपीठ आई कुंजापुरी देवी मंदिराला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री फळदेसाई आणि प्रदेशाध्यक्ष तानावडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत यांची ऋषिकेश, उत्तराखंड येथील गंगा आरतीला हजेरी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऋषिकेश, उत्तराखंड येथील गंगा आरतीला हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री सुभाष फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

साळच्या शासकीय स्मशानभूमीच्या भंगार सामानाची परस्पर विक्री

साळ पुनर्वसन वसाहतीतील शासकीय स्मशानभूमीच्या भंगार सामानाची परस्पर विक्री. मेघ:श्याम राऊत यांच्याकडून डिचोली पोलिसात तक्रार. घोटाळ्यात एका माजी पंचसदस्याचा हात असल्याचा दावा.

बाणावली जिल्हा पंचायत व १० पंचायतीमधील १० प्रभागांमधील पोटनिवडणूक

बाणावली जिल्हा पंचायत व १० पंचायतीमधील १० प्रभागांमधील पोटनिवडणूक वेळापत्रक गोवा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. २३ जूनला ही पोटनिवडणूक होणार आहे तर ५ ते १२ जूनपर्यंत संबंधित तालुक्यातील मामलेदार कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहे. १३ जून उमेदवारी अर्जांची छाननी तर १४ जून अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे व त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची जाहीर केली जाणार आहे.

मंत्री ढवळीकरांची आरजीवर टीका

गोव्यात काही एनजीओ राजकीय पक्ष असल्याचा दावा करतात. मात्र ते राजकीय पक्ष होऊ शकत नाहीत. त्यांची तादक लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळणाऱ्या मतांवरुन कळेल. वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकरांची नाव घेता आरजीवर टीका.

बेकायदेशीर मद्य बाळगल्याप्रकरणी तामिळनाडूच्या व्यक्तीस अटक

मडगाव रेल्वे स्थानकावर तामिळनाडूच्या एका व्यक्तीसह 12,636 किंमताचा 72.26 लिटर मद्यसाठा जप्त. कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई.

Margoa Railway Station
Margoa Railway StationDainik Gomantak

23 जून रोजी गोव्यात पोटनिवडणूक !

बाणावली जिल्हा पंचायत आणि 10 पंचायत प्रभागांसाठीची पोटनिवडणूक 23 जून रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर.

मिरामार किनाऱ्यावर रुतली मासेमार बोट

Miramar Beach, Panaji

मिरामार किनाऱ्यावर मासेमारी करणारी बोट रुतल्याने मोठा गोंधळ झाला. पहाटेपासून बोट बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

सरकारने 'इगो' बाजुला ठेऊन विचार करावा, शाळा उशिराने सुरु करण्यावरुन दुर्गादास कामत

येत्या चार जूनला लोकसभेचा निकाल विचारात घेता, गोव्यातील शाळा दोन दिवस उशिराने सुरु कराव्यात अशी मागणी गोवा फॉरवर्डच्या दुर्गादास कामत यांनी केली होती. याबाबत आता सभापती रमेश तवडकर यांनी देखील सकारात्मकाता दर्शवली आहे.

दुर्गादास कामत यांनी तवडकरांच्या वक्तव्याचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा विचार करावा अशी मागणी केलीय. तसेच, कामत यांनी सरकारने इगो बाजुला ठेवावा, असेही म्हटले आहे.

बिहारचा देखील गोव्यासारखा विकास होऊ शकतो - राजेंद्र आर्लेकर

लहान राज्य असले तरी गोव्याने पर्यटन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात प्रगती केली आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास बिहार देखील गोव्यासारखी विविध क्षेत्रात प्रगती करु शकतो, असा विश्वास बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केला.

Rajendra Arlekar
Rajendra ArlekarDainik Gomantak 

धुळेर येथे कार आणि दुचाकीचा अपघात, दुचाकी चालक जखमी

Duler Car And Bike Accident

धुळेर येथे झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com