Funeral |Accident News Dainik Gomantak
गोवा

Accident News: साळ येथे सासरा-सुनेवर अंत्यसंस्कार

नानोडा-डिचोली येथे झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या सासरा-सुनेच्या पार्थिवांवर शुक्रवारी अंत्यत शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Accident News: नानोडा-डिचोली येथे झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या सासरा-सुनेच्या पार्थिवांवर शुक्रवारी अंत्यत शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर सकाळी दोघांचेही मृतदेह नातलगांकडे सोपवण्यात आले.

नंतर दुपारी साळ येथे मूळ गावी स्थानिक स्मशानभूमीत मृतदेहांना चिताग्नी देण्यात आला. अस्नोडा-दोडामार्ग महामार्गावरील नानोडा येथे कारने कदंब बसला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात महादेव राऊत आणि त्यांची सून सोनाली राऊत हे दोघे ठार झाले. तर सोनाली यांच्या आई शुभदा रेडकर तसेच कारचालक आशिष परब गंभीर जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार मयत सोनालीची आई शुभदा रेडकर यांच्या डोळ्यावर म्हापसातील एका खासगी रूग्णालयात काहीच दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या नेत्र तपासणीसाठी ही सर्व मंडळी म्हापसा येथे सदर रूग्णालयात जात होती.

परंतु सदर रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या कारला अपघात होऊन त्यात दोघांवर काळाने झडप घातली. या कुटुंबात महादेव राऊत यांची पत्नी, पुत्र दीपक, एक विवाहित कन्या व दीपक यांचा तीन वर्षांचा मुलगा आहे.

हेलावणारा प्रसंग

वडील महादेव राऊत आणि पत्नी सोनाली यांच्या मृतदेहांवर एकाचवेळी चिताग्नी देण्याची दुर्दैवी वेळ दीपक राऊत यांच्यावर आली. एकाबाजूने वडील गेल्याचे तर दुसऱ्याबाजूने पत्नी गेल्याचे दुःख.

अशा अवस्थेत जड अंतकरणाने चिताग्नी देण्याची वेळ दीपक यांच्यावर दुर्दैवाने ओढवली. दीपक यांचा तीन वर्षाचा मुलगा असून तो आपल्या आईची आठवण काढून ती अजून का आली नाही, असे सतत विचारत आहे, हा करूण प्रसंग पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावत आहेत.

मान्यवरांकडून सांत्वन

माजी सभापती राजेश पाटणेकर, माजी आमदार नरेश सावळ, माजी जि. पंचायत सदस्य संजय शेट्ये, साळचे उपसरपंच देऊ राऊत, स्थानिक पंचसदस्य, युवा नेते मेघश्याम राऊत,माजी सरपंच घनश्याम राऊत, माजी पंच सुरेंद्र राऊत व इतर लोकप्रतिनिधींनी सासरा-सुनेचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: गोवा होणार देशातले पहिले 'Air Sea Tourism Hub'! मुंबईतील परिषदेत खवंटेंचे सूतोवाच; ‘ओपन स्काय पॉलिसी’ची केली मागणी

Goa Politics: खरी कुजबुज; शिक्षकांना हवी सेवानिवृत्ती वयात वाढ!

Goa Politics: 'गोव्यात हुकूमशाही अन् जंगल राज'! LOP आलेमाव यांचा घणाघात; ‘संविधान बचाव अभियाना'त डिचोलीत जागृती

Goa Beaches: गोवा किनारी क्षेत्राबाबत नवी अपडेट! व्यवस्थापन आराखडा डिसेंबरमध्ये; मच्छीमार वस्तीमध्ये साकारणार पर्यटन प्रकल्प

Ro Ro Ferryboat: 4 बोटींचे काम रो-रो फेरीबोट करणार, 14 जुलैपासून गोमंतकीयांच्या सेवेत; जाणून घ्या 'या' सेवेची वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT