Nana Patekar Dainik Gomantak
गोवा

Nana Patekar News: आता गोव्यातही "नाम" फाऊंडेशनची मुहुर्तमेढ रोवणार; नाना पाटेकरांची घोषणा

NAAM Foundation in Goa: गोव्यातही लवकरच 'नाम' फाऊंडेशन सुरु करणार असल्याची घोषणा अभिनेते नाना पाटेकर यांनी केली आहे. नाना सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत.

Manish Jadhav

Goa News: आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 'नाम' ची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. यातच आता, गोव्यातही लवकरच 'नाम' फाऊंडेशन सुरु करणार असल्याची घोषणा अभिनेते नाना पाटेकर यांनी केली आहे. नाना सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोवा विद्यापीठात नाना यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. नाना यांनी विविध विषयांवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संवाद साधला.

नाना म्हणाले की, 'गोव्यातही लवकरच "नाम" फाऊंडेशन सुरु करण्यात येईल. गोव्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य देत जलसंवर्धनाचे काम सुरु करण्याचा आमचा मानस आहे.'

दुष्काळग्रस्तांच्या वेदना, दु:ख आणि दारुण परिस्थिती मी पाहून आलो आहे. कितीही केले तरी कमी पडावे, इतके त्यांचे दु:ख मोठे आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर जे करणे शक्य होते, ते केलेच, पण त्यापलीकडे अधिक व्यापक स्तरावर काय करता येईल, याचा विचार ‘नाम फाउंडेशन’पर्यंत आम्हाला घेऊन आला’, असे नाना यांनी यापूर्वी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nana Patekar Virat Kohli Fan: “विराट आऊट झाल्यावर जेवणाचा मूड जायचा”, नाना पाटेकर होते कोहलीचे डाय हार्ड फॅन; क्रीडा जगतानेही गमावला एक सच्चा चाहता

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून 3 टक्के महागाई भत्ता वाढ जाहीर; पगारात किती वाढ होणार?

Nana Patekar Funeral In Pune: नाना पाटेकर यांच्यावर पुण्यात होणार अंत्यसंस्कार; डोणजे गावातील शेतातच शेवटचे विधी करण्याची होती अभिनेत्याची इच्छा

Bee Attack: 50 फूट उंचीवर मधमाशांचा हल्ला; दोघे गंभीर जखमी, अग्निशमन दलाने केली थरारक सुटका

Luthra Brothers Bail: लुथरा बंधूंना सशर्त जामीन मंजूर, प्रत्येकी लाखाचा जातमुचलका; देश सोडण्यास मनाई

SCROLL FOR NEXT