Goa Navratri 2024: छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्यात आगमन होण्यापूर्वीचे देवीचे मंदिर कोणते माहितीये?

Chamundeshwari of Pilgaon Bicholim History: डिचोली तालुक्यातील वरगांव या गावी पाचशे वर्षांपूर्वी येऊन वसलेले अन तिथलेच होऊन बसलेले अतिशय रम्य व प्रेक्षणीय देवीस्थळ म्हणजे श्री चामुंडेश्वरी देवस्थान.
Chamundeshwari of Pilgaon Bicholim History: डिचोली तालुक्यातील वरगांव या गावी पाचशे वर्षांपूर्वी येऊन वसलेले अन तिथलेच होऊन बसलेले अतिशय रम्य व प्रेक्षणीय देवीस्थळ म्हणजे श्री चामुंडेश्वरी देवस्थान.
Chamundeshwari of Pilgaon Bicholim GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Chamundeshwari of Pilgaon Bicholim Information

प्रा. विघ्नेश शिरगुरकर वांते, सत्तरी गोवा

(vighneshshirgurkar@gmail.com)

गोव्यातील किनारपट्टी भागातून आतील मध्य भाग तसेच ईशान्य, पुर्व व आग्नेय भागात पोर्तुगीज काळात प्रचंड स्थलांतर झाले. देवीदेवतांसोबत माणसांचे स्थलांतर झाले. बार्देश व तिसवाडी (जुन्या काबिजादी) तालुक्यातून डिचोली (नवी काबिजाद) तालुक्यात तर अनेक देवस्थानांचे स्थलांतर झाले. ज्या ठिकाणी ही देऊळेराऊळे स्थलांतरित झाली त्याठिकाणी त्यांचे उदार अंतःकरणाने स्वागत झाले. त्यांना देवस्थान व एकुण प्राकार वसवण्यासाठी मुक्तहस्ते भुदान झाले.

जुन्या काबिजादी अर्थात बार्देश, तिसवाडी, मुरगांव व सालसेत या तालुक्यातून नव्या काबिजादी अर्थात पेडणे, डिचोली, सत्तरी, फोंडा, सांगे, केपे, काणकोण या तालुक्यांमध्ये हे स्थलांतर झाले‌. यामध्ये डिचोली तालुक्यातील वरगांव या गावी पाचशे वर्षांपूर्वी येऊन वसलेले अन तिथलेच होऊन बसलेले अतिशय रम्य व प्रेक्षणीय देवीस्थळ म्हणजे श्री चामुंडेश्वरी देवस्थान.

चंड व मुंड या दोन असुरांचा वध करणारी महाकाली, महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका परमेश्वर चामुंडेश्वरी या नावाने भक्तांकडून वंदिली जाते. देवीचे मंदिर पुर्वाभिमुख असून देवीची मूर्ती ही महिषासुरमर्दिनी दशभुजा रूपात स्थित आहे. बाहेरचा मंडप आतील सभामंडप तसेच गर्भगृह असे मंदिराचे बांधकाम आहे.

Chamunda Temple Facebook

संपूर्ण मंदिर हे जांभ्या दगडात बनवलेले असून सद्यस्थितीत मंदिराचे पुरातन भारतीय स्थापत्यशास्त्रानुसार सिमेंट न वापरता नुतनीकरण करण्यात येत आहे. देवळाच्या उजव्या बाजूला अर्थात देवीच्या डाव्या बाजूला सुमारे दहा ते पंधरा फूट खोल तलाव आहे. क्षेत्रपाल, निरंकार, गोमेश्वर, मूळपुरुष, काळभैरव या इतर पंचायतन सहपरिवार देवतांची मंदिरे मोठ्या मंदिराच्या उजव्या बाजूला तळीच्या मागच्या बाजूला आहेत.

Chamundeshwari of Pilgaon Bicholim History: डिचोली तालुक्यातील वरगांव या गावी पाचशे वर्षांपूर्वी येऊन वसलेले अन तिथलेच होऊन बसलेले अतिशय रम्य व प्रेक्षणीय देवीस्थळ म्हणजे श्री चामुंडेश्वरी देवस्थान.
Goa Navratri 2024: भल्या मोठ्या घंटेचे पोर्तुगीजांच्या न्यायालयात का होतं महत्त्व? श्री महालसा देवी मंदिराचा इतिहास जाणून घ्या

इतिहास (History of Chamunda Temple Bicholim)

हे देवालय मूळचे तिसवाडी तालुक्यातील वेल्हा गोवा या गावातील होते. या गावाला प्राचीन काळी गोपकापट्टणम् म्हणत असत. तिसवाडीवर पाद्रींची, धर्मगुरूंची व पोर्तुगीजांची धाड पडली अन् ही अशी अनेक देवालये विस्थापित व्हायला सुरुवात झाली. गोवा वेल्हा गावातून श्री चामुंडेश्वरी देवीची मूर्ती घेऊन तिथले ग्रामस्थ व महाजन समुद्रमार्गे पिळगावपर्यंत आले की थेट भुमार्गाने चालत आले याविषयी कोणतीही ठोस माहिती वा दस्तावेज उपलब्ध नाही.

सुमारे ५०० वर्षापुर्वी देवीला घेऊन महाजन व भक्त वरगांवात आले. हा काळ १५६० ते १५८० यामधील असावा असा कयास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गोव्यात आगमन होण्यापूर्वी श्री चामुंडेश्वरीचे मंदिर वरगांव येथे अस्तित्वात होते अशा आशयाचा शिलालेख मंदिरातच मोडी लिपीत कोरलेला आढळून येतो. महाजन व‌ विश्वस्तांना जिथपर्यंत माहिती आहे त्यानुसार वर्तमान मूर्ती ही गोवा वेल्हा येथून आणलेली मूर्ती आहे. ही देवी कदंब राजघराण्याची कुलदेवता होती अशीही माहिती महाजनांकडून मिळते.

Chamunda Temple Facebook

सुमारे २१० वर्षांपूर्वी या मंदिराचे पुनर्निर्माण झाले या पुर्वेतिहासाचा महाजन मंडळीनी प्रामुख्याने उल्लेख केला. गोवा वेल्हा येथील देवीच्या स्थानाचा शोध अजून लागायचा आहे व त्याबाबतीत देवस्थान विश्वस्त व महाजन मंडळींनी पुरातत्व खात्याशी फक्त तोंडी व्यवहार केला आहे पण ठोस असा पत्रव्यवहार वा कागदोपत्री प्रक्रिया झालेली नाही. जिथे मंदिर होते तिथे आता चर्च उभी आहे अशी वदंता असल्याचेही महाजन मंडळी नमूद करतात.

महत्त्व ( Importance of Chamundeshwari Temple Pilgaon)

श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण या देवीप्रमाणे श्री चामुंडेश्वरी देवी घर, जमीन वा माणूस मागते. यात देवीची मागणी आहे म्हणजे देवीने अमक्या माणसाला 'आपला' किंवा 'आपल्याला हवा' म्हणून मागितलाय. यात भौतिक स्वरूपात कसलीही मोठी देवाण-घेवाण होत नाही. माणसाला मागणी असेल तर त्याच्या नावाने 'पड' अर्थात एक नारळ,थोडे तांदूळ व काहीतरी पैसे देवीला दरवर्षी अर्पण करायचे.

श्री चामुंडेश्वरी या आदिशक्ती देवीला एका वेगळ्याच प्रकारचे तेज प्राप्त आहे अशी संबंध गोव्यातील भाविकांची श्रध्दा आहे व याचा प्रत्यय तेव्हा येतो जेव्हा गोव्यातील अनेक वा कदाचित प्रत्येक देवस्थानांच्या अंतर्गत समस्या सोडविण्यासाठी कौलप्रसाद घ्यायला महाजन या देवस्थानात येतात. त्याबाबतीत श्री चामुंडेश्वरी देवीला विशेष महत्त्व आहे.

Chamunda Temple Facebook

मूर्तीस्थापना, मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना, देवीदेवतांचे तत्व असे क्लिष्ट विषय घेऊन कौलप्रसादावर विचार विनिमय करण्यासाठी महाजन मंडळी अगदी आशेने देवीच्या चरणी येतात. या देवस्थानाशी शेट गोवेकर, शेट टोपले, शेट आमोणकर, कांगणे व दड्डीकर असे प्रामुख्याने वैश्य समाजातील महाजन संबंधित आहेत‌. तसेच बहुजन समाजातील नाईक गोवेकर, वस्त, वरगांवकर, पोळे व नाईक अशा कुळावी महाजनांसाठी ही देवी महत्वाची आहे. शिंदे, तुरी गोवेकर, मोर व ठोसे आडनावाची कुटूंबे देखील श्री चामुंडेश्वरीला आपली कुलदेवता मानतात.

Chamundeshwari of Pilgaon Bicholim History: डिचोली तालुक्यातील वरगांव या गावी पाचशे वर्षांपूर्वी येऊन वसलेले अन तिथलेच होऊन बसलेले अतिशय रम्य व प्रेक्षणीय देवीस्थळ म्हणजे श्री चामुंडेश्वरी देवस्थान.
Goa Navratri 2024: पोर्तूगीजांच्या भीतीपोटी स्थलांतर; श्री कामाक्षी रायेश्वर संस्थानाचा इतिहास जाणून घ्या

वैशिष्ट्य (History of Chamunda Temple Marathi)

पौष शुद्ध पौर्णिमेला देवीची 'खेत्र' प्रथा पाळली जाते व क्षेत्रपालाला बळीचा बहुमान दिला जातो. या दिवशी ज्यांची परंपरा आहे ते भाविक कोंबड्यांचा बळी द्यायचे. सध्या बहुसंख्य भाविक नारळ वाढवून परंपरा पाळतात. देवळाच्या उजव्या बाजूला असलेल्या तलावात पौष महिन्यातील कृष्ण प्रतिपदेला देवीचा वार्षिक 'सांगोड' अर्थात नौका विहार होतो.

Chamundeshwari of Pilgaon Bicholim History: डिचोली तालुक्यातील वरगांव या गावी पाचशे वर्षांपूर्वी येऊन वसलेले अन तिथलेच होऊन बसलेले अतिशय रम्य व प्रेक्षणीय देवीस्थळ म्हणजे श्री चामुंडेश्वरी देवस्थान.
Goa Navratri 2024: भल्या मोठ्या घंटेचे पोर्तुगीजांच्या न्यायालयात का होतं महत्त्व? श्री महालसा देवी मंदिराचा इतिहास जाणून घ्या

नवरात्री विशेष (Navratri In Goa)

या देवालयात नवरात्रीच्या नऊही रात्रीत मखरोत्सव आयोजित केला जातो. सकाळी अभिषेक, व सप्तशती वाचन, संध्याकाळी पुराण व घुमटाच्या तालावर मखरारती होते. परसदा वितरण व नंतर अल्पोपहार ठेवला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी सिमोल्लंघन करते. आपट्याच्या झाडापाशी पालखीची पूजा होते व‌ सोनं लूटलं जातं.

कसे पोहोचाल? (How to reach Bicholim?)

  • पणजी, म्हापसा येथून डिचोलीपर्यंत खाजगी व कदंब बसेस आहेत.

  • डिचोलीतून वेळापत्रकानुसार बसने जाता येते किंवा पायलट, रिक्षा वा टॅक्सी करून जाता येते.

  • थिवी रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण केवळ १५ किमी अंतरावर आहे.

  • मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे देवस्थान एका तासाच्या अंतरावर म्हणजेच ४० किमी आहे.

  • दाबोळी विमानतळापासून हे देवस्थान दीड तासाच्या अंतरावर म्हणजेच ३५ किमी आहे.

कुठे राहाल? (Where to stay in Bicholim?)

हे देवालय ग्रामीण भागात आहे पण येथे देवस्थानच्या भक्तनिवासात राहण्याची सोय आहे. निर्व्यसनी व शुद्ध शाकाहार पाळणारे कुणीही भाविक वा पर्यटक येथे राहू शकतात.

खर्च (Cost)

ग्रामीण भागातील देवस्थान असल्याकारणाने खर्च सुमारे ₹१५००-२००० प्रतिदिन होऊ शकतो.

हे करा (Do's)

  • देवालयात जाताना अंगभर कपडे घालावेत.

  • शांतता राखावी.

  • देवस्थानच्या भक्तनिवासात व प्राकारात स्वच्छता राखण्यास मदत करावी.

Chamunda Temple Facebook

हे करू नका (Dont's)

  • देवालय व संस्थानच्या प्राकारात मद्यपान, धुम्रपान, मत्स्याहार व मांसाहार करून प्रवेश करू नये.

  • देवस्थानच्या भक्तनिवासात वास्तव्यास येत असल्यास आगाऊ सूचना देऊनच यावे. रात्री अपरात्री देवस्थान प्राकार व भक्तनिवासात परवेश करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com