Mumbai Goa Highway 
गोवा

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाला नितीन गडकरींचे नाव द्या; मनसे नेते अविनाश जाधव

मुंबई - गोवा महामार्गाचे काम मागील बारा वर्षांपासून रखडले आहे.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway: मुंबई - गोवा महामार्गाचे काम मागील बारा वर्षांपासून रखडले आहे. महामार्गाबाबत वारंवार राजकीय पक्ष, स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केले. मनसेच्या वतीने राज्य सरकारला धारेवर धरले जात आहे.

पुढील वर्षी महामार्ग खुला करण्याचे आश्वासन शिंदे सरकारने दिले असले तरी संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे काम सुरु असल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यात आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी या महामार्गाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नाव दिले जावे अशी मागणी केली आहे.

'कोकण एक्सप्रेस महामार्गाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नाव द्या, अशी आम्ही मागणी करणार आहोत. कारण हा इतिहासात जाणारा रस्ता आहे, 18 वर्षे झालं या महामार्गाचे काम सुरु आहे आणि अजून काही दिवस या रस्ताचे काम होताना दिसत नाही.'

'वशिष्ठी नदीच्या रस्त्यावरील सळ्या वर आल्या आहेत, यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. अशा निकृष्ट दर्जाचे काम होणार असेल, आणि गडकरी फक्त बाता मारणार असतील तर, या महामार्गाला एकदाचे गडकरींचे नाव देऊनच टाका,' असे मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.

दरम्यान, नुकतेच महामार्गावरील चिपळूणच्या बहादूर शेख नाका येथे उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याची घटना समोर आली. दुर्घटना घडली त्यावेळी सुदैवाने या परिसरात कोणी नसल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

महामार्गाचे रखडलेले काम आणि पुलाच्या निकृष्ट दर्जाबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसने केली आहे.

महामार्गाच्या कामावर खर्च केलेले कोट्यवधी रुपये धुळीला मिळाले, अशी भावना प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT