Blast In Goa Dainik Gomantak
गोवा

Blast In Goa: नाकेरी परिसरात संचारबंदी कायम! स्फोटप्रकरणाचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Nakerim Betul Blast: गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. सुमारे साडेचौदा टन गनपावडर असलेल्‍या बंकरला आग लागल्‍याने मोठा स्‍फाेट झाला होता.

Sameer Panditrao

मडगाव: नाकेरी-बेतूल येथील  दारूसाठा बंकरमधील स्फोटप्रकरणी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस म्हणाल्या, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी पेट्रोलियम ॲण्ड सेफ्टी ऑर्गनायझेशनने (पेसो) आपले मुंबई येथून पथक पाठविले आहे. या पथकाने केलेल्या तपासणीचा अहवालाची आम्ही वाट पाहात आहोत. तो आल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल.

मात्र, सुरक्षेचा उपाय म्हणून या परिसरात लागू केलेली संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

गुरुवारी  रात्री  साडे दहाच्या सुमारास ही  दुर्घटना घडली होती. सुमारे साडेचौदा टन गनपावडर असलेल्‍या बंकरला आग लागल्‍याने मोठा स्‍फाेट झाला होता. या दुर्घटनेत बंकरची पूर्णत: नासधूस होऊन सहा कोटींची हानी झाली होती. तरी सुदैवाने प्राणहानी झाली नाही. 

या कंपनीचे मुख्‍य व्‍यवस्‍थापक अजय गोएंका यांनी हा दारूसाठा हाताळताना कंपनीकडून कुठल्‍याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही. हे गोदाम सुरू करताना ‘पेसो’ने ज्‍या सूचना केल्‍या होत्‍या, त्‍यांचे तंतोतंत पालन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT