Court Order, summons  Canva
गोवा

Nakerim Betul: बेतुल स्फोट दुर्घटनेची फाईल अडकली लालफितीत, कंपनी​चा गोदाम परवाना रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती

Nakerim Betul Company Fire: स्फोट प्रकरणानंतर ​या कंपनीच्या प्रतिनिधींवर आम्ही दखलपात्र गुन्हा नोंद केला असून, चौकशी अद्याप सुरू असल्याची माहिती कुंकळ्ळी ठाण्याचे निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी दिली.

Sameer Panditrao

मडगाव: ​वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील ​ह्यूझेस प्रेसिजन कंपनी​तील एका भागाला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. याचवर्षी २० मार्चला नाकेरी-बेतूल ​येथील या कंपनीच्या गोदामाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीच्या गोदामाचा परवाना रद्द करण्याचा आदेश जारी केला होता, तो मुख्य सचिवांनी स्थगित ठेवला आहे.

केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत ही कंपनी पेट्रोलियम ॲण्ड सेफ्टी ऑर्गनायझेशन संस्थे​ने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करीत नाही, तोपर्यंत या गोदामाला परवाना देऊ नये, असे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले होते. सध्या ही फाईल मुख्य सचिवांकडे असून त्यांनी हा आदेश स्थगित ठेवला आहे.

लोकांच्या विनाशाला कारणीभूत ठरणाऱ्या अशा प्रकल्पाला माझा विरोध आहे आणि मी लोकांसोबत राहणार, असे ते म्हणाले. मार्चमध्ये बेतुल येथे घडलेल्या स्फोट आणि आगीच्या घटनेची पेट्रोलियम ॲण्ड सेफ्टी ऑर्गनायझेशनने गंभीर दखल ​घेताना, त्यांनी या कंपनीला दिलेला परवाना तूर्त रद्द केला ​होता.

ज्या ठिकाणी आग लागली, ती जागा दारूगोळा ठेवण्यासाठी सुरक्षित होती का, अशी विचारणा या संस्थेने ​ह्यूझेस प्रेसिजन कंपनीला केली होती. मात्र, ही जागा असुरक्षित असावी, असे या घटनेवरून दिसते. या पार्श्वभूमीवर त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली ​होती. या नोटिसीला २१ दिवसांच्या आत उत्तर देण्यास बजावले आहे. अन्यथा परवाना कायमचा रद्द का करू नये, अशी विचारणाही केली ​होती.

कंपनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा

ह्यूझेस प्रेसिजन ही मूळ बंगळुरू (कर्नाटक) येथील कंपनी आहे. बेतुल येथील स्फोट प्रकरणानंतर ​या कंपनीच्या प्रतिनिधींवर आम्ही दखलपात्र गुन्हा नोंद केला असून, चौकशी अद्याप सुरू असल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे निरीक्षक डायगो ग्रासियस यांनी दिली.

गोदाम सुरू होऊ देणार नाही!

बेतुल येथील गोदाम पुन्हा सुरू झाले आणि भविष्यात काही अप्रिय घडना घडली तर काय होईल, याची चिंता येथील ग्रामस्थांना लागून राहिली आहे. हे गोदाम पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून आम्ही हा प्रयत्न हाणून पाडू, असे आमदार डिकॉस्ता म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT