Nakerim Betul Blast Dainik Gomantak
गोवा

Nakerim Betul Blast: नाकेरी-बेतुल स्‍फोट प्रकरण; ह्यूजेस कंपनीच्‍या विरोधात कुंकळ्‍ळी पोलिस स्‍थानकात तक्रार

Blast In Goa: नाकेरी-बेतुल येथे स्‍फोटके साठवून ठेवलेल्‍या गोदामाला आग लागून स्‍फोट झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: नाकेरी-बेतुल येथे स्‍फोटके साठवून ठेवलेल्‍या गोदामाला आग लागून स्‍फोट झाला होता. ज्‍या कंपनीचे हे गोदाम होते त्‍या ह्यूजेस प्रेसिशन मॅन्‍युफॅक्चरिंग या कंपनीच्‍या विरोधात नाकेरी-बेतूल पंचायतीने मानवी जीवनाला धोकादायक असे साहित्‍य साठवून ठेवल्‍याच्‍या आरोपाखाली तक्रार दिली आहे.

मागच्‍या महिन्‍यात या कंपनीच्‍या गोदामात असा स्‍फोट झाला होता. त्‍यावेळीही पंचायतीने आपला विरोध व्यक्त केला होता.

हे गोदाम सुरू करताना कंपनीने पंचायतीकडून कुठलाही ना हरकत दाखला घेतला नव्‍हता, असा दावा करून हे गोदाम स्‍थानिकांसाठी धोकादायक असल्‍याचा दावा पंचायतीने आपल्‍या तक्रारीत केला आहे.

कुंकळ्‍ळी पोलिस स्‍थानकात तक्रार दिली आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांना विचारले असता, यासंदर्भात यापूर्वीच कंपनीच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असून पोलिस चौकशी करीत आहेत, अशी माहिती त्‍यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT