Naibag pernem firing, curchorem shooting 2022, goa sand mafia case Dainik Gomantak
गोवा

Naibag Firing: 3 वर्षांपूर्वीची गोव्यातील चतुर्थी, वाळूमाफियांचा कुडचडेत गोळीबार; कामगाराने गमावला होता प्राण

Curchorem Firing Death: मुंबईत ज्‍या प्रकारे गँगवार चालू असते, त्‍याच धर्तीवर गोव्‍यातही वाळूमाफियांच्‍या टोळ्‍या एकमेकांवर कुरघोडी करू पाहत असल्‍याचे त्‍यावेळी स्‍पष्‍ट झाले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: न्‍हयबाग-पेडणे येथे वाळूमाफियांच्‍या गँगमधील वैमनस्‍यातून झालेल्‍या गोळीबार प्रकरणामुळे तीन वर्षांपूर्वी बाणसाय-कुडचडे येथे झालेल्‍या अशाच प्रकारच्‍या गोळीबार प्रकरणाला उजाळा मिळाला. संपूर्ण गोवा चतुर्थीचा सण साजरा करत असताना १ सप्‍टेंबर २०२२ रोजी झालेल्‍या या गोळीबारात वाळूमाफियाकडे रोजंदारीवर काम करणारे दोन कामगार गंभीर जखमी झाले होते. त्‍यातील युसूफ आलम याला आपला जीव गमवावा लागला होता.

आपली हुकमत प्रस्‍थापित करण्‍यासाठी मुंबईत ज्‍या प्रकारे गँगवार चालू असते, त्‍याच धर्तीवर गोव्‍यातही वाळूमाफियांच्‍या टोळ्‍या एकमेकांवर कुरघोडी करू पाहत असल्‍याचे त्‍यावेळी स्‍पष्‍ट झाले होते. ही खुनाची घटना घडल्‍यानंतर गोव्‍यातील वाळूमाफियांमधील द्वंद्वाच्‍या घटना आटोक्‍यात आल्‍या असे वाटत असले तरी ते अजूनही सुरू आहे हे आजच्‍या घटनेने पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट केले आहे.

त्‍या दिवशी पंचमीचा दिवस होता. दीड दिवसाच्‍या श्री गणपतीचे सायंकाळी मोठ्या उत्‍साहात विसर्जन करण्‍याच्‍या तयारीत सर्व गोवा असताना सकाळी-सकाळीच ही खुनाची घटना लोकांसमोर येऊन धडकली होती. त्‍यामुळे फक्‍त कुडचडेच नव्‍हे तर संपूर्ण गोवा सुन्न झाला. त्‍या दिवशी पहाटे बेकायदेशीर वाळू उत्‍खनन सुरू असताना झालेल्‍या गोळीबारात एका बिगरगोमंतकीय कामगाराला आपला जीव गमवावा लागला होता.

या प्रकरणातील मुख्‍य आरोपीला पकडण्‍यासाठी पोलिसांना बराच काळ लागला होता. तीन वर्षांपूर्वी झालेल्‍या या खुनाच्‍या घटनेमुळे गोव्‍यात वाळूमाफियांमधील वैमनस्‍य कोणत्‍या थरावर पोचले आहे याचा प्रत्‍यय आला होता. या वाळूमाफियांना राजकीय आशीर्वाद असल्‍यामुळेच ते या पातळीपर्यंत पोहोचू शकले हेही त्‍यातून पुढे आले होते.

१ सप्‍टेंबर २०२२ रोजी बाणसाय-कुडचडे येथे असे काय झाले, त्‍यामुळे एका कामगाराला आपला जीव गमवावा लागला? त्‍या काळात सावर्डे व कुडचडे परिसरात बेकायदा वाळूमाफियांनी उच्‍छाद मांडला होता. रात्रीचे सगळे झोपले असताना सावर्डे, कुडचडे भागातून वाहणाऱ्या झुवारी नदीच्‍या दोन्‍ही काठांवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूउत्‍खनन चालायचे. सक्‍शन पंप लावून झुवारी नदीचा काठ वाळूमाफियांनी पोखरून काढला होता. या व्‍यवसायावर कोणाची हुकमत असावी यासाठी दोन गटांमध्‍ये चढाओढ सुरू होती. त्‍यातूनच ही घटना घडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT