Nagpur-Goa Expressway Dainik Gomantak
गोवा

Nagpur-Goa Highway: आधी साडेतीन शक्तीपीठांचे तीर्थाटन... मग गोव्यात पर्यटन...

नागपूर-गोवा ग्रीनफील्ड सुपरफास्ट हायवेतून साडेतीन शक्तीपीठे असलेली तीर्थस्थळे जोडली जाणार

गोमन्तक डिजिटल टीम

Nagpur-Goa Highway: गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या नागपूर-गोवा हायवेबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. या हायवेद्वारे आता महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे असलेली तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावर आधी तीर्थाटन आणि नंतर गोव्यात पर्यटन, अशी अनुभूती पर्यटकांना, प्रवाशांना घेता येणार आहे.

नागपूर-गोवा हे सुमारे एक हजार किलोमीटरचे अंतर आहे. नागपूरला गोव्याशी जोडणाऱ्या या महामार्गाला नागपूर-गोवा ग्रीनफील्ड सुपरफास्ट हायवे असे नाव देण्यात आले आहे. एरवी नागपूर-गोवा या प्रवासासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. पण आता या नव्या हायवेमुळे नागपूर-गोवा प्रवासाचा हा वेळ 11 तासांवर येणार आहे.

त्यामुळे प्रवाशांची, पर्यटकांची सोय होणार आहे. शिवाय नागपूर हे मध्यभारतातील महत्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे थेट मध्य भारतातून गोव्यात येण्याच्या दृष्टीनेही हा महामार्ग महत्वाचा ठरणार आहे.

विशेष म्हणजे, या महामार्गात भाविकांची श्रद्धास्थाने असलेली महत्वाची तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत. साडेतीन शक्तीपीठे म्हणून ओळखली जाणार तुळजापूरची भवानीमाता, माहुरची रेणूकादेवी, नाशिकच्या वणीतील सप्तश्रृंगीदेवी आणि कोल्हापुरची अंबाबाई ही साडेतीन शक्तीपीठे या महामार्गातून जोडली जाणार आहेत.

त्यादृष्टीनेही हा महामार्ग महत्वाचा ठरणार आहे. कोल्हापुरातून पुढे सिंधदुर्गात कुणकेश्वर आणि गोव्यातील पत्रादेवी ही ठिकाणेही या महामार्गावर असणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे धार्मिक पर्यटनाचे पॅकेज या महामार्गातून साकारले जात आहे.

याशिवाय महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ हे प्रांतदेखील प्रवासाच्या दृष्टीने अधिक जवळ येणार आहेत. हा महामार्ग महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांतून जाणार असून त्यासाठी सुमारे 70 हजार कोटी रूपये खर्च प्रस्तावित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

अ‍ॅलन-रविरा गोव्यात विवाहबद्ध! 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

आंध्रप्रदेशात पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी शॉक लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरु

Abhinav Tejrana Double Century: रणजी पदार्पणातच ठोकलं द्विशतक, तेंडुलकर, कोहलीला जे जमलं नाही, ते करुन दाखवलं; अर्जुन तेंडुलकरनंतर गोव्याचा 'अभिनव' चमकला

गोवा म्हणजे फक्त Sun, Sand, Sea नाही! पर्यटनमंत्र्यांचा 'गेम-चेंजिंग' मास्टरस्ट्रोक, परशुरामाचा भव्य प्रकल्प बनणार नवी ओळख

SCROLL FOR NEXT