Tower Rental scam Dainik Gomantak
गोवा

Nagargaon मध्ये मोबाईल टॉवर भाडे घोटाळा झाल्याचा आरोप

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल: सखोल चौकशीची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी: सर्वांत युवा सरपंच म्हणून बहुमान मिळवणारे नगरगाव-सत्तरी पंचायतीचे माजी सरपंच पराग खाडिलकर यांच्या सन 2017 ते 2018 या कार्यकाळात मोबाईल टॉवर करारविषयक आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ अर्जुन गुरव यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

(Nagargaon, Sattari tower rental scam)

गुरव यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पंचायत नोंदीप्रमाणे नगरगाव पंचायत कार्यक्षेत्रात सात टॉवर आहेत. त्‍यात भारत संचार निगमचे टॉवर, इंडस टॉवर, रिलायन्स, जिओ, इफॉकॉम लिमिटेडचा समावेश आहे. परंतु, पंचायतीने टॉवर मालक आणि ज्या जमीन मालकांच्या जागेत हे टॉवर आहेत त्यांच्याकडून कोणतेही भाडे अथवा कर घेतलेला नाही.

तत्कालीन सरपंच पराग आणि उपसरपंच समीक्षा सालेलकर यांनी पंचायतीच्यावतीने काही ग्रामस्थांशी मोबाईल टॉवरविषयी करार केला असून त्याद्वारे हजारो रुपयांचे वार्षिक भाडे घेण्यात आले. परंतु माहिती अधिकारातून असे कोणतेच भाडे अथवा कर घेतला नाही, असे समोर आले आहे.

त्‍यामुळे पंचायतीचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असा दावा करत भ्रष्टाचाराची शक्यता तक्रारीत वर्तविण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गुरव यांनी केली आहे. दरम्‍यान, आरोपाच्‍या अनुषंगाने माजी सरपंच पराग खाडिलकर यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला असता तो होऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT