Nagargao Electricity Shortage  Dainik Gomantak
गोवा

Nagargao Electricity Shortage : 'ती सहा गावे' दिवसभर अंधारात; ''तालुका वीस वर्षे मागे गेलाय'', जनतेतून संताप व्यक्त

वारंवार बत्ती गूल : परिसरातील पाणीपुरवठ्यावरही परिणाम

गोमन्तक डिजिटल टीम

सत्तरी तालुका सध्या वीस वर्षे मागे गेल्यातच जमा आहे,अशा प्रतिक्रिया सध्या जनतेतून व्यक्त होत आहेत. महिना उलटला तरीही सत्तरी तालुक्यातील वीज समस्या काही सुटेनात, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आज रविवारी नगरगाव पंचायत क्षेत्रातील बहुसंख्य गावे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अंधारातच होती. परिणामी लोकांतून संताप व्यक्त होत आहे.

रविवारी रात्री उशीरा पर्यंत तरी वीज पुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. नगरगाव पंचायत भागात साट्रे, देरोडे, कोदाळ, माळोली, नानोडा, बांबर ही गावे अतिशय दुर्गम परिसरात वसलेली आहेत. तिथे वीज समस्या अत्यंत गंभीरच बनत चालली आहे. तसेच धावे, उस्ते आदी गावातही वीज समस्या आहे. यावर सरकारी यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण नसल्याची लोकभावना निर्माण झालेली आहे. नगरगाव भागात वीज बंच केबल हे केवळ लोकांना गाजर दाखविण्याचे झाले आहे. बंच केबल वारंवार नादुरुस्त होते आहे. बंच केबल एकदा दुरुस्त केली की, पुन्हा शॉर्ट सर्कीट होऊन नादुरुस्त होते, परिणामी वीज पुरवठा खंडित होतो.

महिना उलटला तरीही सत्तरीतील वीज समस्या सुटेनात

वीज समस्या नित्याचीच

रविवारचा दिवस नगरगाव काही गावे भाग पूर्णपणे अंधारातच होती. पहिल्याच पावसात वीज पुरवठा खंडित होणे,हे दरवर्षी अन् नित्याचेच बनले आहे. विशेषतः नगरगाव पंचायत भागातील अनेक गावात वीज समस्या जटीलच बनली आहे. केवळ पावसामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे कारण तरी काय ? असा सवाल करून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. ना मोठे वादळ, ना विजेचा लखलखाट, ना ढगांचा गडगडाट तरीही सात्यत्याने वीज पुरवठा खंडित होते आहे.

पावसाच्या पाण्यावरच भिस्त !

नगरगाव भागात बंच केबल सेवेला अगदी ग्रहण लागले आहे. वीज खाते यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यास असमर्थ ठरले आहे. वीज नसल्याने पाणी पुरवठ्यावरही रविवारी परिणाम दिसून आला. वीज नसल्याने पाणी पुरवठा विभागाला लोकांना पाणी देता आले नाही. प्रसंगी लोकांना पावसाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT