Electricity Issue Canava
गोवा

Goa Electricity Department: नगरगावात विजेचा 'खेळ मांडला'

Sattari Nagargao Panchayat: चार दिवसांपूर्वी वेळगे ग्रामस्थांनी वीज खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला होता

गोमन्तक डिजिटल टीम

सत्तरीतील नगरगाव पंचायत क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून विजेची समस्या उग्र बनली आहे. त्‍यामुळे नागरिक संतप्त बनले आहेत. काल शुक्रवारी रात्रभर क्षणाक्षणाला विजेचा लपंडाव सुरू होता. किमान शंभरहून अधिक वेळा तरी वीज आली आणि गेली.

नगरगाव पंचायत क्षेत्रात धावे, उस्ते, बांबर, नानोडा, माळोली, साट्रे, देरोडे, कोदाळ या गावांना विजेच्या लपंडावाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आज शनिवारीही सायंकाळी विजेचा लपंडाव सुरूच होता. या गावात बंच वीज केबल घातलेल्या आहेत, पण त्या वारंवार जळत आहेत.

दर पाच मिनिटांनी वीज येते आणि पुन्हा जाते. फोन करून विचारणा केली तर ‘फिडर नादुरुस्त आहे’ असे साचेबद्ध उत्तर दिले जाते. जो बंच केबल घालण्यात आला आहे, तो पूर्णतः निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे ही समस्‍या वारंवार उद्‌भवत आहे.

चार दिवसांपूर्वी वेळगे ग्रामस्थांनी वीज खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला होता. माळोलीतील लोकांनीही धडक दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Upasnagar Sankval Junction: भुयारी मार्ग नाही तर रस्त्यावर उतरू! उपासनगर-सांकवाळ ग्रामस्थांचा इशारा; चौक ठरतोय ‘मृत्यूचा सापळा’

VIDEO: "चिदंबरम यांच्या काळात 5000 निष्पाप मारले गेले!"; 'दिमागी नक्षल' मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर कडाडून हल्लाबोल, सुधांशु त्रिवेदींनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT