Mysterious Deaths In Goa Dainik Gomantak
गोवा

Mysterious Deaths In Goa: गोव्यात चाललंय काय? आणखी एक अनोळखी मृतदेह सापडला, दोन दिवसांत तीन घटना

दोन दिवसांत उघडकीस आलेल्या तीन घटनांमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

Pramod Yadav

Mysterious Deaths In Goa: गोव्यात दोन दिवसांत तीन अनोळखी मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी तांबडीसुर्ला आणि वेर्ला-काणका येथे अनोळखी मृतदेह सापडले त्यानंतर सोमवारी वाडे तळ्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. वास्को पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरु आहे.

रविवारी तांबडीसुर्ला येथील धबधब्याच्या पाण्यात एक अज्ञात व्यक्तीचा कुंजलेला व नग्न्न अवस्थेत मृतदेह आढळुन आला.  त्यानंतर वेर्ला-काणका बायपास रस्त्याच्या बाजूला असलेल्या ओहोळात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

रविवारी दोन घटना उघडकीस आल्यानंतर आता सोमवारी एक मृतदेह आढळ्यानंतर आता गोव्यात नक्की चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दोन दिवसांत उघडकीस आलेल्या तीन घटनांमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान, तांबडीसुर्ला येथील धबधब्याच्या पाण्यात सापडलेला मृतदेह कर्नाटक राज्यातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेहाचे वय 30 ते 40 दरम्यान, असून कुळे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT