Margao Dainik Gomantak
गोवा

Margao Crime : मडगावात फ्लॅटमध्ये दोघा भावांचा गूढ मृत्यू; परिसरात खळबळ

Margao Crime : आज (बुधवारी) ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर या भागात एकच खळबळ उडाली. महम्मद झुबेर खान (वय २९ वर्षे) आणि अफान खान (वय २७ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत, तर त्यांच्या आईचे नाव रुक्साना खान (वय ५४ वर्षे) आहे, अशी माहिती मडगाव पोलिसांनी दिली. या दोन्ही भावांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Crime :

फातोर्डा, आके येथील एका फ्लॅटमध्ये दोघे सख्खे भाऊ गूढरित्या मृतावस्थेत आढळले, तर त्यांची आई फ्लॅटमधील त्याच खोलीत झोपलेली दिसून आली. चौकशीवेळी त्यांची आई मनोरुग्ण असल्याचे आढळून आले. त्यामुळे या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.

आज (बुधवारी) ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर या भागात एकच खळबळ उडाली. महम्मद झुबेर खान (वय २९ वर्षे) आणि अफान खान (वय २७ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत, तर त्यांच्या आईचे नाव रुक्साना खान (वय ५४ वर्षे) आहे, अशी माहिती मडगाव पोलिसांनी दिली. या दोन्ही भावांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या दोघा भावांच्या मृत्यूस कोण कारणीभूत आहे, याचा पोलिस सध्या शोध घेत आहेत.

आके येथील पॅराडाईस इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली. खान कुटुंबीयांमध्ये घरगुती कारणामुळे वादविवाद होता.

रुक्सानाचे पती त्यांच्याबरोबर राहात नव्हते. हे कुटुंबीय इमारतीत राहणाऱ्या अन्य लोकांच्याही संपर्कात नव्हते. त्यामुळे त्यांच्याविषयी इमारतीमधील रहिवाशांनाही अधिक माहिती नाही. अनेकवेळा या फ्लॅटमधून भांडणाचा आवाज ऐकू यायचा, असे येथील स्थानिकांनी सांगितले.

रुक्साना यांची दोन्हीही मुले सुशिक्षित होती. मात्र, त्यांच्यात कौटुंबिक वाद होता. त्यातूनच ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. पोलिसांनी मात्र यावर भाष्य करणे टाळले. आम्ही सर्व दृष्टीकोनातून तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश शिरवईकर तपास करीत आहेत.

फ्लॅटमध्ये अन्नपाणीच नाही

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लॅटमध्ये अन्नपाण्याचा एक कणही नव्हता. मडगाव पोलिस विभागाचे उपअधीक्षक सलीम शेख यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दोन्ही मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवले आहेत. त्यांच्या आईला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन दिवस वडील दार ठोठावायचे पण...

मृत भावांचे वडील गेले दोन दिवस या फ्लॅटकडे येत होते. मात्र, आतून कुणीच प्रतिसाद देत नव्हते. बुधवारी सायंकाळी ते फ्लॅटवर आले होते. त्यांनी दरवाजा ठोठावूनही बघितला. मात्र, कुणीच प्रतिसाद न दिल्याने शेवटी त्यांनी मडगाव पोलिस ठाण्यात कळविले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनाही बोलावून घेतले. जवानांनी दरवाजा उघडल्यानंतर आत हृदयद्रावक दृश्‍य दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: 'गोंयची दिवाळी, पावसांन व्हावली', हवामान खात्याकडून Yellow Alert; नागरिक आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Fuel Truck Explodes: पेट्रोलने भरलेला टँकर रस्त्यावर उलटला, इंधन गोळा करताना झाला स्फोट; 31 जणांचा जागीच मृत्यू! VIDEO

राज्यात आधुनिक क्रीडा सुविधांसाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही; युवा क्रीडापटूंना संधी देण्यावर भर

Gorvancho Padwo: शेणाचे गोठे, कारिटांच्या गायी; 'गोरवांचो पाडवो' साजरा करण्याची गोव्याची अनोखी

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी चूक, हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी मोठा अपघात टळला; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

SCROLL FOR NEXT