Myron Rodrigues Property Seized  Dainik Gomantak
गोवा

Myron Rodrigues Goa: गोवा, मुंबई आणि पुण्यातील कोट्यवधी मालमत्तेसह मायरान रॉड्रिग्सची 41 लाखांची संपत्ती जप्त

Myron Rodrigues Case: सरकारकडून शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत पती-पत्नीकडून एकूण ४१ लाखांहून अधिक बँकेतील ठेवी तसेच स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीये

Akshata Chhatre

Myron Rodrigues Dipali Parab Goa

फातोर्डा: गोवा ते थेट आंतराष्ट्रीय स्थरावर मालमत्ता असलेल्या संशयित मायरान रॉड्रिग्स आणि त्याची पत्नी दीपाली परब यांच्यावर गोवा सरकारने मोठी कारवाई कलेची आहे. १३० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात मायरान रॉड्रिग्स हाच प्रमुख संशयित आहे. गोवा सरकारकडून शुक्रवारी (दि. ११) करण्यात आलेल्या कारवाईत रॉड्रिग्स पती-पत्नीकडून एकूण ४१ लाखांहून अधिक बँकेतील ठेवी तसेच स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीये.

गोवा सरकारच्या वित्त विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रणव भट यांनी जारी केलेल्या आदेशानुसार संशयितांची मालमत्ता जप्त करण्यात आली. मालमत्ता जप्त केलेल्या ठिकाणांमध्ये मुंबई आणि पुण्यासह गोव्यातील फातोर्डा, नुवे, कुठ्ठाळी अशा भागांचा समावेश आहे. या कारवाईत संशयितांची जळवळपास ४१ लाख रुपयांहून अधिक बँक रक्कम गोठवण्यात आलीय.

वित्त विभागाने केलेल्या या कारवाईत संशयित मायरान रॉड्रिग्स आणि त्याची पत्नी दीपाली परब यांच्याकडून फातोर्डा, नुवे, कुठ्ठाळी , लवासा,कल्याण, वडाळा येथील खाई फ्लॅट्स तसेच बंगले जप्त करण्यात आलेत.

शिवाय मायरान रॉड्रिक्सच्या बँक खात्यातून १,९४,७६० आणि पत्नीच्या खात्यातून ३९,३८,९०२ आणि ३५,२५,००० रक्कम जप्त करण्यात आलीये.

गोव्यातील ३८ गुंतवणूकदारांची केली फसवणूक

संशयित मायरान रॉड्रिग्स आणि त्याची पत्नी दीपाली परब यांच्यावर गोव्यातील एकूण ३८ गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. वर्ष २०२३ मध्ये गोव्यातील आर्थिक गुन्हे शाखेने २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप नोंदवला होता. यानंतर झालेल्या तपासात संशयित मायरान रॉड्रिग्सने १३० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची बाब उघड झाली होती, तसेच त्याने आयडीलीक गोवन गेटवेज नावाच्या कंपनीत ३.२५ कोटी रुपये गुंतवल्याची माहिती मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: आज अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

SCROLL FOR NEXT