
Myron Rodrigues Share Market Scam Bail To Sunita
मडगाव: फातोर्डा ते लंडन अशी व्याप्ती असलेला १३० कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मायरॉन रॉड्रीगीस याची पहिली पत्नी सुनीता रॉड्रीगीस हिला जामीनमुक्त करण्याचा आदेश दक्षिण गोव्याच्या प्रधान सत्र न्यायाधीश शेरीन पॉल यांनी दिला.
संशयित रॉड्रीगीस हिची रवानगी यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे चौकशीसाठी तिला आणखीन ताब्यात ठेवण्याची गरज नाही असे नमूद करून तिला ५० हजारांच्या वैयक्तिक आणि तेवढ्याच रकमेच्या आणखी एका हमीवर जामीनमुक्त करावे, असा आदेश देण्यात आला.
या प्रकरणात क्राईम ब्रँच तपास करीत असून मायरॉन रॉड्रीगीस आणि त्याची सध्याची पत्नी दीपाली परब या दोघांनी अन्य संशयितांच्या साहाय्याने सुमारे ५० गुंतवणूकदारांना १०० कोटीपेक्षा अधिक गंडा घातल्याचा आरोप असून या प्रकरणातील मुख्य संशयित मायरॉन रॉड्रीगीस हा ब्रिटनमध्ये पळून गेला आहे. या घोटाळ्यातून जी रकम गोळा केली त्यातून जी मालमत्ता खरेदी केली त्यातील काही मालमत्ता सुनीता रॉड्रीगीस हिच्या नावावर असल्याने तीही या गुन्ह्यातील साथीदार असा पोलिसांचा दावा आहे.
रॉड्रीगीस हिच्यावतीने न्यायालयात बाजू मांडताना ॲड. एस. सरदेसाई यांनी आपली अशील ही मायरॉन रॉड्रीगीसपासून कधीचीच विभक्त झालेली आहे. मायरॉनकडून खुद्द तिलाही गंडा बसलेला आहे. या संबंधात आपल्या अशिलाने पोलिस तपासात सर्वतोपरी सहकार्य करूनही तिला आता या प्रकरणात बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न चालू आहे असा दावा केला.
जामीनमुक्त करताना तिने आपला पासपोर्ट तपास अधिकाऱ्याकडे जमा करावा,तपास अधिकारी किंवा कोर्टाच्या परवानगीशिवाय गोवा आणि देशाबाहेर जाऊ नये अशी अट घातली आहे. तसेच पुढील आठ दिवस क्राईम ब्रँचच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे, असेही या आदेशात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.