Goa Fraud: 41.54 लाखांची फसवणूक करणाऱ्या रॉड्रिग्ज बंटी बबली विरोधात आरोपपत्र दाखल; इंटरपोल जारी करणार ‘रेड कॉर्नर’ नोटीस

Myron Rodrigues And Deepali Parab Against Chargesheet Filed: फरारी असलेल्या मायरॉन रॉड्रिग्ज व त्याची पत्नी दीपाली परब या दोघांविरुद्ध मडगाव येथील प्रधान सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
Myron Rodrigues And Deepali Parab Against Chargesheet Filed
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Investment Fraud

पणजी: शेअरबाजार व वित्तीय कंपन्यांमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून भरमसाट व्याज देण्याचे आमिष दाखवून ४१.५४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने (ईओसी) फरारी असलेल्या मायरॉन रॉड्रिग्ज व त्याची पत्नी दीपाली परब या दोघांविरुद्ध मडगाव येथील प्रधान सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

संशयित मायरॉन रॉड्रिग्ज हा विदेशात फरारी झाला असल्याने त्याच्याविरुद्ध ब्लू नोटीस जारी करण्यात आली असून लवकरच इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी केली जाणार आहे. नावेली - सालसेत येथील इव्हॉन सुरेश ज्योकिम आल्मेदा याने आर्थिक गुन्हे कक्षाकडे तक्रार दाखल केली होती.

१ मार्च २०२३ ते ९ ऑगस्ट २०२३ या काळात संशयितांनी त्यांना शेअरबाजार व वित्तीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक (Investment) करण्याचे आमिष दाखवले. त्यांना २५ ते ४५ टक्के अधिक रक्कम परतावा गुंतवणुकीवर मिळेल असे आश्‍वासन दिले. त्यानुसार त्यांनी ४९ लाख रुपये संशयिताच्या बँक खात्यावर जमा केले.

Myron Rodrigues And Deepali Parab Against Chargesheet Filed
Goa Fraud Case: ईडीची मोठी कारवाई! मायरन रॉड्रिग्जची 3 कोटींची मालमत्ता जप्त; गोमंतकीयांना घातला कोट्यवधींचा गंडा

गुंतवणुकीची मुदत संपल्यावर संशयितांनी परताव्याची पूर्ण रक्कम देण्याऐवजी फक्त गुंतवणूक केलेल्यांपैकी १२.४५ लाख रुपये परत केले. मात्र, व्याजासह उर्वरित ३६.५४ लाख दिले नाहीत. तरीही तक्रारदाराने आणखी ५ लाख रुपये संशयिताकडे गुंतवणुकीसाठी दिले. संशयित रक्कम देत नसल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

Myron Rodrigues And Deepali Parab Against Chargesheet Filed
Goa Fraud Case: गोमंतकीयांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या मायरन रॉड्रिग्जच्या पहिल्या पत्नीला अटक

या तक्रारीच्या तपासकामावेळी आर्थिक गुन्हे कक्षाने संशयिताची पहिली पत्नी सुनिता रॉड्रिग्ज हिच्या नावावर असलेले तीन फ्लॅट्स जप्त केले तसेच बँक (Bank) खात्यावर असलेले १.९४ लाख रुपयेही गोठवले. याव्यतिरिक्त त्याच्या नावावरील आणखी दोन फ्लॅट्स तसेच खात्यावरील ३५.२५ लाखांची रक्कम गोठवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com