Goa Finance Fraud Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: गोमंतकीयांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या मायरन रॉड्रिग्जच्या पहिल्या पत्नीला अटक

Goa Police: कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्यातील कथित मुख्य आरोपी मायरन रॉड्रिग्ज याची पहिली पत्नी सुनीता रॉड्रिग्ज हिला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली.

Manish Jadhav

पणजी: कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्यातील कथित मुख्य आरोपी मायरन रॉड्रिग्ज याची पहिली पत्नी सुनीता रॉड्रिग्ज (Sunita Rodrigues) हिला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी (7 डिसेंबर) अटक केली. गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याच्या बहाण्याने मायरन आणि त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केली.

दरम्यान, सुनीताचा या फसवणुकीमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे तसेच घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासात उघड झाल्यानंतर तिला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिला चौकशीसाठी बोलावले असतानाही ती टाळाटाळ करीत होती. अखेर सुनीताला अटक करण्यात आली.

क्राईम ब्रांचकडे तपास

शेअर मार्केटमध्ये (Share Market) आर्थिक गुंतवणुकीद्वारे भरमसाट व्याज देण्याचे आमिष दाखवून मायरन आणि त्याच्या टीमने गोव्यातील सुमारे 50 गुंतवणूकदारांना 130 कोटींचा गंडा घातला. आता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे कक्षाकडून क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेला मुद्देमाल तसेच दस्तावेज त्वरित क्राईम ब्रांचकडे देण्याचा आदेश पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी काढला.

दुसरीकडे, गुंतवणूकदारांची (Investors) रक्कम आयडिलिक गोवन गेटवेज ॲण्ड डेव्हलपमेंट्स प्रा. लि. कंपनीत गेल्याने या कंपनीच्या नोलान लॉरेन्स आंताव (फातोर्डा), ज्योकिम रोझारिओ पिरीस (फातोर्डा), विजय दत्तात्रय जोईल (सिंधुदुर्ग-महाराष्ट्र), नावनिक मारिओ पेरेरा (बाणावली) आणि सुशांत मनोहर घोडगे (पेडणे) यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हा कक्षाने गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Road Accident: उन्नत मार्ग खुला होताच पहिला भीषण अपघात; पर्वरीत दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर! लेन बदलण्याच्या धोक्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Strait Of Hormuz: अमेरिकेची दादागिरी चालणार नाही! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' रोखण्यावरुन इराणची वॉशिंग्टनला खुली चेतावनी; पेझेश्कियान यांनी सुनावले खडे बोल

Horoscope 13 September 2026: बुध-चंद्राचा महासंग्राम! आज 'या' 3 राशींवर ओढवणार मोठे संकट? पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

SCROLL FOR NEXT