JEE Advance  Dainik Gomantak
गोवा

JEE Advance मध्ये मुष्टिफंडच्या अदीपची बाजी

16 विद्यार्थी चमकले गुणवत्ता यादीत : ‘बिटसॅट’मध्ये यंदा चार विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये सुधारणा

गोमन्तक डिजिटल टीम

JEE Advance आयआयटी, एनआयटी, आयआयआयटीसह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई ॲडव्हान्स) निकाल रविवारी जाहीर झाला.

यात मुष्टिफंड आर्यन उच्च माध्यमिकच्या १६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले, तर ‘बिटसॅट’च्या दुसऱ्या प्रयत्नात चार विद्यार्थ्यांनी गुणांमध्ये सुधारणा केली.

याविषयी माहिती देताना मुष्टिफंड आर्यनचे प्राचार्य व्यंकटेश प्रभुदेसाई म्हणाले की, जेईईच्या अखिल भारतीय रँकिंगमध्ये (एआयआर) अदीप कुंकळ्येकर याने १,५७६ वे स्थान पटकावले आहे. अदीपने ३६० पैकी २०१ गुण मिळवले.

गेल्या वर्षी आशिष झांट्येने ३६० पैकी १९९ गुण मिळवले होते. रँकिंगचा विचार केला तर आर्यनचे पहिल्या ५ हजार एआयआरमध्ये पाचजण आणि पहिल्या दहा हजार एआयआरमध्ये १२ विद्यार्थी आलेले दिसतात. तर वरील चारजण २० हजार एआयआरमध्ये आलेले आहेत.

अत्यंत कठीण असलेल्या या परीक्षेमध्ये यशाचे सातत्य राखल्याबद्दल प्राचार्य प्रभुदेसाई यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. दरवर्षी गोव्यातून साधारण ५० विद्यार्थी जेईई ॲडव्हान्सला परीक्षेला बसतात.

मुख्य परीक्षेचा निकाल झाल्यानंतरच किती विद्यार्थी गोव्यातून पात्र ठरले होते ही संख्या कळते, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. ‘बिटसॅट’चा दुसरा प्रयत्न सुरू झाला.

पहिल्या दिवशीच ४ विद्यार्थ्यांनी गुण सुधारले. ते विद्यार्थी असे : मुकुंद काकोडकर (२८६), श्रेयस चव्हाण (२८५), इशान भाटे (२३८), प्रभाव उप्पर (२३६).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lionel Messi In India: 3 दिवस, 4 शहरं… मेस्सी भारत दौऱ्यावर! कधी, कुठे आणि कोणत्या कार्यक्रमात उपस्थित राहणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Goa ZP Election 2025: भाजप 40, मगोच्या वाट्याला 3 जागा तर सात जागांवर अपक्ष उमेदवार; सत्ताधाऱ्यांचा फॉर्म्युला फिक्स

Watch Video: संघ हरला म्हणून राग आला, चाहत्यांनी स्टेडियमच पेटवलं; क्षणात सगळं जळून खाक, आग लावणारे 15 वर्षांखालील मुलं

चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! सुपरमार्केटमध्ये पिशवी घेवून गेला अन्…. Viral Video एकदा बघाच

अग्रलेख: कष्टकऱ्यांचा आनंदोत्सव! ख्रिस्तीकरणानंतरही पूर्वकालीन संकेत विसरले नाहीत; गोमंतकीयांच्या भक्तीचा 'सांगडोत्सव'

SCROLL FOR NEXT