Goa Feni
Goa Feni Dainik Gomantak
गोवा

Goa Alcohol Museum: पर्यटकांना पाहता येणार ब्राजिल टू गोवा पर्यंतची 'फेणी'ची सफर

Priyanka Deshmukh

भारतामध्ये (india) गोव्याची (Goa) ओळख पोर्तुगाल, ब्राझील आणि पश्चिमेकडील रोम म्हणून आहे. गोवा राज्य भारतात असूनही, गोव्याची वेगळीच खासीयत पर्यटकांना (Tourist) बघायला मिळते. आणि म्हणूनच गोवा अख्या जगभर प्रसिध्द (World Famous) आहे. आपल्या वेगळ्या ओळखीमुळे देशी आणि विदेशी पर्यटकांसाठी गोवा आकर्षणाचे विशेष केंद्र राहिले आहे. पण समुद्रकिनाऱ्या (Goa Beach) पलिकडे जावूनही राज्याची आणखी एक खास ओळख आहे आणि ती म्हणजे येथिल स्थानिक दारू 'फेणी' (Feni). हेच कारण आहे की फेनीचा प्रवास सांगण्यासाठी गोव्यात एक संग्रहालय तयार केले गेले आहे. काय आहे या देशातील पहिल्या अल्कोहोल संग्रहालयाचे वैशिष्ट्य?

'ऑल अबाउट अल्कोहल'

हे संग्रहालय स्थानिक व्यावसायिक नंदन कुडचडकर यांनी गोव्याच्या कांदोळी गावात बांधले आहे. नंदनने या संग्रहालयाला 'ऑल अबाऊट अल्कोहोल' असे नाव दिले आहे. या अल्कोहोल संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणजे वाइन साठवण्यासाठी वापरले जाणारे कृत्रिम जार, शतकांपासून वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक काचेच्या भांड्यात ठेवलेली फेणी या सगळ्यांची माहिती सांगते. आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नंदन म्हणाले की, "हे संग्रहालय तयार करण्यामागे एक उद्देश आहे. ज्यामध्ये गोव्याच्या विशेष सांस्कृतिक वारशाची कथा सांगणे, विशेषत: फेनीच्या सुरुवातीची कथा आणि ब्राझील ते गोवा अल्कोहल संबंधित प्रवासाची कथा सांगणे. अशा काही महत्वाच्या माहितीचा समावेश आहे."

पोर्तुगीजांनी गोव्यात काजू आणले

इतिहासकारांच्या मते, गोव्यातील पहिले काजूचे झाड पोर्तुगीजांनी 1700 मध्ये ब्राझीलमधून आणले होते. ब्राझील आणि गोवा या दोन्ही देशांमध्ये लुसोफोनियन वसाहतीचा प्रभाव होता आणि आहे. येथे, जेव्हा ब्राझीलमधून आणलेली काजूची रोपे गोव्याच्या भूमीवर लावली गेली, तेव्हा काजूसह फेनीच्या दारूनेही गोव्याच्या जेवणामध्ये आपली मुळे रोवली.

फेनीचे सर्व्हिंग प्रकार

काजूपासून तयार झालेली ही दारू ज्याला 'काजू अ‍ॅपल' म्हणतो त्याच्या तुकड्यांना सडवून तयार केली जाते. डबल डिस्टिल्ड अल्कोहोलला 'उराक' म्हणतात जे फेनी म्हणून गोव्यात लोकप्रिय आहे. फेनीला लवंगा, काळी मिरी, जायफळ, दालचिनी सारख्या मसाल्यांमध्ये मिसळून 'मसाला फेनी' नावाचा दुसरा प्रकार बनवला जातो. काजू फेणीसोबत नारळ फेणीही तयार केली जाते. काजूच्या या फेणीला जिओटॅगिंगही मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT