National Highway Dainik Gomantak
गोवा

Goa: मुरगाव पालिकेची धडक कारवाई, बेकायदेशीर अतिक्रमण हटवले

National Highway: राष्ट्रीय महामार्ग मांगुरहिल, वरुणापुरी वास्को येथे बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या फळभाजी दुकानावर मुरगाव पालिकेतर्फे पाडण्यात आले.

दैनिक गोमन्तक

वास्को: राष्ट्रीय महामार्ग मांगुरहिल, वरुणापुरी वास्को येथे बेकायदेशीर अतिक्रमण केलेल्या फळभाजी दुकानावर मुरगाव पालिकेतर्फे पाडण्यात आले. सदर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे वास्को वाहतूक पोलिसांना मांगुरहिल रस्त्याच्या बाजूस अतिक्रमण केल्यामुळे अवजड वाहनाबरोबर इतर वाहनांना खूपच त्रासदायक ठरत असल्याचे अनेक वेळा निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली होती. यामुळे वाहतूक पोलिसांच्या आदेशाद्वारे पालिकेने पोलीस बंदोबस्तात येथील सर्व बेकायदेशीर फळ, भाज्यांचे गाडे जमीन दोस्त केले.

दरम्यान, मुरगाव नगरपालिकेने (Margao Municipality) शनिवार (दि.२३) वास्को मांगुरहिल वरुणापुरी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस बेकायदेशीररित्या उभारलेल्या अंदाज चार फळभाज्यांची दुकाने वाहतूक पोलिसांच्या आदेशाद्वारे कारवाई करून पाडली. सदर परप्रांतीयांनी मांगुरहिल वरुणापुरी राष्ट्रीय महामार्गाच्या (National Highway) दाबोळी विमानतळा जवळ जाताना, मुख्य वळणावर बेकायदेशीर फळभाजी व इतर दुकाने थाटली होती.

दुसरीकडे, दुकानावर पालिकेने अनेक वेळा कारवाई करून सुद्धा तेथे पुन्हा दुकाने थाटली होती. जेव्हा वरुणापुरी गांधीनगर ते बायणा मुरगाव पर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे उड्डाणपूलाचे लोकार्पण झाले, तेव्हा मांगोरहिल वरुणापुरी वळणाजवळ परप्रांतीयांनी बेकायदेशीर फळभाजी व इतर दुकाने उभे उभी केली होती. सदर या फळ, भाज्यांच्या दुकानामुळे महामार्गावरील अवजड वाहनाबरोबर इतर वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊ लागल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी या दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

तसेच, वाहतूक पोलिसांच्या (Police) निवेदनाद्वारे मुरगाव नगरपालिकेने शनिवारी वास्को पोलिसांच्या सहकार्याने चार पेक्षा जास्त बेकायदेशीर दुकाने जमीनदोस्त केली. यावेळी पालिकेचे निरीक्षक योगेश देसाई, निरीक्षक प्रकाश हरीजन, पोलीस उपनिरीक्षक वर्षदा नाईक, उपनिरीक्षक पालिका कामगार उपस्थित होते.

शिवाय, मांगोरहिल आणि रुणापुरी वळणावर नौदलाने बेकायदेशीररित्या राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमण केले असून यावर अजूनही प्राधिकरणातर्फे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नौदलाने महामार्गावर अतिक्रमण केलेल्या ठिकाणी त्वरित कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला देऊन सुद्धा कारवाई केली नसल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर नौदलाने राष्ट्रीय महामार्गावर सुशोभीकरण करून महामार्गाच्या नियमाचे उल्लंघन केले असल्याने, सदर कारवाई करण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वेळ काढत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

Rohit-Virat Comeback: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी पुन्हा मैदानात उतरणार रोहित-विराट; ऑस्ट्रेलियात रंगणार रणसंग्राम

SCROLL FOR NEXT