Hindusthan Petroleum Dainik Gomantak
गोवा

मुरगाव पालिकेची ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ ला सूचना

ठराव पालिका संचालकांकडे : जमीन भाडेपट्टीच्या थकबाकीवर 15 टक्के व्‍याज द्या

दैनिक गोमन्तक

वास्को: आपल्या ताब्यातील सुमारे 9700 चौरस मीटरपेक्षा अधिक जमीन मुरगाव नगरपालिकेकडे सोपविण्यास तसेच वनटाईम सेंटलमेंटच्‍या धर्तीवर 7 कोटी 93 लाख रुपये थकबाकी देण्यास येथील हिंदुस्थान पेट्रोलियम महामंडळ राजी झाले आहे. मात्र हिंदुस्थान पेट्रोलियमने 12 टक्क्यांऐवजी 15 टक्के व्याजाचा विचार करावा असा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठविण्याचा ठराव मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सदर ठराव मान्यतेसाठी पालिका प्रशासन संचालनालयकडे पाठविण्यात येणार आहे.

(Murgaon Municipality Notice to 'Hindusthan Petroleum')

मुरगाव पालिकेने 1997 साली वरील जमीन हिंदुस्थान पेट्रोलियमला भाडेपट्टीवर दिली होती. भाडेपट्टीच्या थकबाकीवर 4 टक्के व्याज आकारण्यात येणार होते. त्यानंतर 2004 मध्ये व्याजाचा दर प्रतिवर्ष 5 टक्क्यांवर नेण्यात आला. परंतु पालिका कायद्यानुसार व्याजाचा दर 18 टक्के आहे. तो 2003 पासून लागू करण्यात आला होता. मुरगाव पालिकेने जी जागा भाडेपट्टीवर दिली होती, त्या जागेसंबंधी प्रत्येक तीन वर्षांनंतर नूतनीकरण करण्याची गरज होती. परंतु नूतनीकरण करण्याचे काम अधिकारी वर्गाकडून झाले नाही. मुरगाव पालिकेच्या अधिकारीवर्गाच्या निष्काळजीपणामुळे पालिकेला मोठ्या महसुलाला मुकावे लागले. दरम्‍यान, पालिका गॅरेजच्या जागी बहुउद्देशीय पार्किंग प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाऐवजी तेथे कमर्शिअल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

..तर पालिकेला मिळाले असते 30 कोटी रुपये

हिंदुस्थान पेट्रोलियमने वनटाईम सेटलमेंट करताना 2004 ते 2022 पर्यंतची रक्कम 12 टक्के व्याज दराने फेडण्यास सहमती दाखविली आहे. त्यामुळे मुरगाव पालिकेच्या तिजोरीत सुमारे आठ कोटी रुपये जमा होतील. काहींच्या मते 2003 पासून 18 टक्के दराने व्याज आकारले असते, तर ती रक्कम 30 कोटींच्या घरात गेली असती. परंतु पूर्वीच्या पालिका मंडळाने त्‍याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पालिकेला मोठी रक्कम पदरी पाडून घेता आली नाही. आता हिंदुस्थान पेट्रोलियमने वनटाईम सेटलमेंट 12 टक्के व्याजाऐवजी 15 टक्के व्याजाने रक्कम फेडावी, असा ठराव पालिका मंडळाने आज शनिवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. त्‍यावर आता पालिका संचालनालय कोणता निर्णय घेते, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT