Congress Workers  Dainik Gomantak
गोवा

मुरगाव महिला काॅंग्रेसचे मिलिंद नाईक यांना 'हे' खुले आव्हान

महिला पोलिसांनी तक्रारीची साधी दखलही घेतली नाही उलट मिलिंद नाईक यांना क्लीन चिट दिली, असे काॅंग्रेस नेत्या तथा नगरसेविका श्रद्धा आमोणकर म्हणाल्या.

दैनिक गोमन्तक

मुरगाव: आमदार मिलिंद नाईक यांनी एका महिलेसोबत कांड केले नाही हे त्यांनी वास्कोकरांचे ग्राम दैवत श्री देव दामोदर समोर येऊन नारळावर प्रमाण होऊन सांगावे असे खुले आव्हान मुरगावमधील महिला काॅंग्रेसने त्यांना दिले आहे. त्यासाठी सोमवारी (दि.24) दुपारी 12:30 वाजता मंदिरात येऊन खरे खोटे काय ते देवासमोर सांगावे असे महिला काॅंग्रेसने सुचविले आहे. (Milind Naik Congress Goa Latest News)

मुरगाव महिला काॅंग्रेस समितीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन वरील आव्हान मिलिंद नाईक (Milind Naik) यांना दिले आहे. काॅंग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी भाजपचे उमेदवार मिलिंद नाईक यांचे वासनाकांड पुराव्यानिशी उघड केले आहे. याप्रकरणी महिला पोलिसांकडे रितसर तक्रारही केली आहे पण सरकारच्या दबावाखाली येऊन महिला पोलिसांनी तक्रारीची साधी दखलही घेतली नाही उलट मिलिंद नाईक यांना क्लीन चिट दिली त्यामुळेच भाजपाने त्याला उमेदवारी दिली असे काॅंग्रेस नेत्या तथा नगरसेविका श्रद्धा आमोणकर यांनी पत्रकारांना सांगितले.

मिलिंद नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांत हिम्मत असेल तर त्यांनी सोमवारी श्री दामोदर मंदिरात येऊन आपले त्या महिले बरोबर कसलेच नाते नव्हते, तीला गरोदर करून गर्भपात करायला भाग पाडले नाही हे देवासमोर नारळावर प्रमाण होऊन मिलिंद नाईक यांनी सांगावे, असे सौ.आमोणकर यांनी त्यांना आव्हान दिले.

मिलिंद नाईक आपले हे आव्हान स्विकारीत नसेल तर संकल्प आमोणकर आपले कुटुंब आणि कार्यकर्त्यांना घेऊन देवासमोर नारळावर हात ठेवून प्रमाण व्हायला तयार आहे की, मिलिंद नाईक यांनी एका महिलेसोबत कांड केले आहे.यालाही मिलिंद नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते राजी नाही तर एका सभागृहात मुरगावमधील काॅंग्रेस आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांना मिलिंद नाईक यांच्या कांडची चित्रफीत आणि ध्वनीफीत दाखवू असा प्रस्ताव मुरगाव महिला काॅंग्रेस (Congress) समितीने भाजप कार्यकर्त्यांसमोर ठेवला आहे. मिलिंद नाईकने मोठे कांड केले आहे.त्याचा मुरगावमधील महिला धिक्कार करीत आहेत.अशा व्यक्तीला पुन्हा मुरगावमधून निवडून देऊ नका असे आवाहन महिला अध्यक्ष सीमा बेहेरे यांनी केले.

मुरगावच्या माजी नगराध्यक्ष भावना भोसले यांनी मिलिंद नाईक यांच्या दादागिरीचा खरपूस समाचार घेतला.घराघरात ,भावा - भावांमध्ये,मित्रा- मित्रांत भांडणे लावणे, लोकांच्या घरांवर बुलडोझर फिरविणे, लोकांच्या लहान सहान व्यवसायावर गदा आणणे,सरकारी कर्मचाऱ्यांना दूर ठिकाणी बदली करण्याची धमकी देणे,कोणी विरोध केल्यास घरे जाळण्याची धमकी देणे,मुरगाव बंदरात काम आणि व्यवसाय करणाऱ्यांना छळणे अशी दादागिरी मिलिंद नाईकची चालली आहे.या सर्व प्रकारच्या छळाला मुरगावतील जनता कंटाळली असून या खेपेस त्यांचा पराभव अटळ आहे असे सौ.भोसले म्हणाल्या.मुरगावच्या माजी उपनगराध्यक्ष रीमा सोनुर्लेकर यांच्याशी ज्या उद्धटपणे आणि वादग्रस्त शब्दोच्चार करून मिलिंद नाईक यांनी वाद घातला यावरुन ह्या व्यक्तीचे महिलांबाबत असलेले वागणे कसे आहे हे सिद्ध होते असे सौ.भोसले यांनी पत्रकारांना सांगितले.यावेळी सरोज मांद्रेकर आणि नगरसेविका योगीता पार्सेकर यांनी यावेळी मुरगावमधून काॅंग्रेसचे संकल्प आमोणकर हेच बहुमताने निवडून येणार असे खात्रीने सांगितले.या पत्रकार परिषदेस नैनिता पोळजी, मीली भगत,व इतर काॅंग्रेस महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT