Heavy Rain In Murgao Gomantak Digital Team
गोवा

Heavy Rain In Murgao: अवकाळी पावसामुळे मुरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी झाले मोठे नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

Heavy Rain In Murgao : मुरगाव तालुक्यात गुरुवारी (ता.१) पहाटे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. एक तासभर पडलेल्या पावसामुळे वास्को, बायणा, मांगोरहील व वेळसाव येथे झाडे पडली. वास्को-गांधीनगर कंटेश्वर मंदिराजवळ एका घरावर फणसाचे झाड पडल्याने 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. मांगोरहील गणपती मंदिरामागे कडुलिंबाचे झाड घरावर पडल्याने त्यांचे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर बायणा-मोगा बाय, काटे बायणा व सार्वजनिक बांधकाम भूगटार प्रकल्पात माड पडल्याने अंदाजे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले.

अचानक पडलेल्या वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र यात कोणालाही दुखापत झाली नाही. वास्को अग्निशमन दलाच्या सहकार्याने सर्व झाडे कापून बाजूला करण्यात आली.दरम्यान, कुठ्ठाळी-वेळसाव येथील अवर लेडी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेलेल्या वृद्ध जोडप्याच्या मारुती व्हॅनवर माड पडल्याने वाहनातील वृद्ध महिला मारीया मार्कीस यांच्या खांद्याला दुखापत झाली.

यावेळी वाहनात त्यांचे पती पेद्रू अँथोनियो होते. यावेळी माड वृद्ध जोडप्याच्या वाहनावर पडण्यापूर्वी सर्वप्रथम दुसऱ्या एका माडावर पडला, नंतर चर्चच्या कुंपणावरून व्हॅन वर पडला. सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. नंतर वृद्ध महिलेला मडगाव हॉस्पिसियो इस्पितळात उपचार करून घरी पाठविण्यात आले.

गटारातील कचरा रस्त्यावर

जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे काही ठिकाणी गटारे तुडुंब भरून वाहत होती. मान्सूनपूर्व कामे अजून पूर्ण झाली नसल्याने गटारातील माती, कचरा पाण्याच्या प्रवाहात मुख्य रस्त्यावर वाहून आला होता. सुमारे एक तास पाऊस, वादळी वारे झाल्यानंतर पावसाने उसंत घेतली. दिवसभर वातावरण ढगाळ राहिले. अवकाळी पडलेल्या पावसामुळे अग्निशमन दल तसेच पालिका कंत्राटी कामगारांची धावपळ उडाली.

धारबांदोडा, मोलेत मोठे नुकसान ठिकठिकाणी विद्युतवाहिन्या तुटल्या

धारबांदोडा तालुक्यात गुरुवारी (ता.१) रात्री आलेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने वीज खात्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तसेच राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने काही वेळ रस्ता वाहतुकीस बंद होता. रस्त्याच्या बाजूला असलेली गुलमोहराची झाडे विद्युत वाहिन्यांवर मोडून पडल्याने धारबांदोडा येथील ४ वीजखांब मोडले व विद्युत वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुरुस्तीचे व नवीन वीजखांब घालण्याचे काम जोरात सुरू असून लवकरच वीजपुरवठा सुरळीत होणार, असे धारबांदोडा क्षेत्रातील कनिष्ठ अभियंता जितेंद्र जल्मी यांनी सांगितले.

मोले भागातील सुकतळी येथे वीज ट्रान्सफॉर्मरवर भले मोठे झाड वादळी वाऱ्याने मोडून पडल्याने सहा लाखांचे नुकसान झाले. पुन्हा या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर घालावा लागणार आहे तसेच बोंडुमळ या ठिकाणीही काही वीजखांब मोडलेले आहेत. पळसकट्टा व इतर भागात विद्युतवाहिन्या तुटलेल्या आहेत, असे वीज खात्याचे साहाय्यक अभियंता काशेश्वर नाईक यांनी सांगितले.

जमिनीखालून विद्युतवाहिन्या घालण्याचे काम शहरात चालू आहे. मात्र, ग्रामीण भागात जंगलांतून वीजवाहिन्या गेलेल्या आहेत. एखादे झाड वादळी वाऱ्याने मोडल्यास थेट विद्युतवाहिन्यांवर पडते. त्यामुळे वीज संपर्क तुटतो व लोकांना त्रास होतो. तेव्हा संबंधित खात्याने शहरी भागात विद्युतवाहिन्या जमिनीखाली घालण्यापेक्षा ग्रामीण भागातून सुरवात करावी.

शिरीष देसाई, उपसरपंच, साकोर्डा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT