Vasco News  Gomantak Digital Team
गोवा

Vasco News : थकबाकीसह सेवानिवृत्ती वेतनही वेळेवर द्या

माजी कर्मचाऱ्यांची व्यथा : मुरगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांची नगराध्यक्षांकडे मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

आम्हांला सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, दोन वर्षापूर्वी जाहीर झाली असूनही महागाई भत्त्यांसह थकबाकी अद्याप मिळाली नाही, निवृत्ती वेतनही वेळेवर मिळत नाही. मग आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करावा, वैद्यकीय खर्च कसा पेलावा?‍ याबाबत नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज यांच्याकडे कैफियत मांडली. तेव्हा नगराध्यक्षांनी समस्या काढण्याचे आश्‍वासन दिले.

वारंवार निवेदने देऊन, भेटी घेऊनही आम्हांला न्याय मिळत नसल्याचा दावा संबंधितांनी केला. आम्हांला निदान निवृत्ती वेतन वेळेवर द्या. काही वेळा निवृत्ती वेतन दोन महिन्यांनी मिळते, काही वेळा अर्धा महिना संपल्यानंतर निवृत्ती वेतन हाती पडते. आम्हांला निदान महिन्याच्या पहिल्या तारखेला निवृत्ती वेतन द्यावे. जेणेकरून आम्हांला आमच्या गरजा भागविता येईल, असेही निवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

रॉड्रिग्ज म्हणाले, समस्यांची आपणास कल्पना आहे. आपण काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. भाडेपट्टीसंबंधी पालिका कायद्यामध्ये सुधारणा झाल्यास मुरगाव पालिकेची आर्थिक स्थिती सुधारेल. त्यामुळे सदर प्रश्र्न आम्ही मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांसमोर मांडून त्यांना याप्रकरणी तोडगा काढण्याची विनंती करणार आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

SCROLL FOR NEXT