Anjuna Crime Dainik Gomantak
गोवा

Anjuna Crime: हणजुणात दोघांवर खुनी हल्ला, 5 बिहारींना अटक

दारूच्या नशेत केला हल्ला; एकाची प्रकृती गंभीर, गोमॅकोमध्ये उपचार सुरू

Akshay Nirmale

Anjuna Crime: हणजुण येथे दारूच्या नशेत दोघांवर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी पाच परप्रांतीय कामगारांना अटक केली आहे. हे पाचही कामगार मूळचे भितसरी, बेगुसराय बिहार येथील रहिवासी आहेत. दीपक पासवान, रोशन पासवान, दीक्षांत पासवान, किशन पासवान आणि सुमित कुमार शाह अशी या पाच जणांची नावे आहेत. त्यांच्यावर हणजुण येथील दोघांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

याबाबत हणजुण पोलिसात तक्रार करण्यात आली होती. एसी दुरूस्तीचे काम करणाऱ्या सोहेल शेख (वय 24) आणि त्यांचा मित्र वासिम शेख यांनी याबाबत तक्रार दिली आहे. वासिम हे मुळचे मुंबईचे आहेत. तक्रारीनुसार सोहेल आणि वासिम हे दोघेही एका बांधकाम साईटजवळ थांबले होते. तेव्हा दारूच्या नशेत असलेल्या या पाचही बिहारी कामगारांनी त्यांच्याजवळ येऊन उगाचच भांडण काढले. आणि थेट हल्लाच चढवला.

यात वासिम यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली. वासिम याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी गोमॅकोमध्येमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सोहेल आणि वासिम एसी दुरूस्तीच्या कामासाठी गोव्यात आले होते. 9 जानेवारी रोजी रात्री हा प्रकार घडला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही बिहारी कामगारांना अटक केली आहे.

पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, म्हापसाचे एसडीपीओ जिवबा दळवी, पोलिस निरीक्षक प्रशाल नाईक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धीरज देवीदास पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Crime: 2 महिला, एका बालिकेची निर्घृण हत्‍या! एक मृत्‍यू संशयास्‍पद; महिलांसोबतच्या वाढत्या घटनांनी डिचोली हादरले

Fishermen Pele: 'चर्चवरील हल्ल्याने मन व्यथित झाले'! मच्छीमार पेलेने व्यक्त केली खंत; दोषींवर कारवाईची केली मागणी

पर्यटकांसाठी महत्वाची अपडेट! गोव्यातून परतीचा प्रवास महागला; तिकीटदर दुपटीपेक्षा जास्त; वाढीव रकमेमुळे कोलमडले बजेट

Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपतींनी मुर्मूंनी केला ‘वाघशीर’मधून प्रवास! ‘INS हंसा’ तळावर भव्य स्वागत; स्पेक्ट्रमची केली पाहणी

देशाला हादरवून सोडणाऱ्या 2025 मध्ये गोव्यात घडलेल्या तीन घटना

SCROLL FOR NEXT