Crime Dainik Gomantak
गोवा

Swapnil murder case: सहा संशयितांवर आरोप निश्चित

या प्रकरणातील सर्व संशयितांनी आपल्यावरील आरोप नाकारले.

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगावसह (Margao) संपूर्ण राज्याला एका वर्षांपूर्वी हादरवून सोडणाऱ्या स्वप्नील वाळके खून प्रकरणातील 5 संशयितांविरुद्ध दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केल्याने या प्रकरणी आता साक्षी पुरावे नोंदवून घेण्यास सुरुवात होणार आहे. या प्रकरणातील सर्व संशयितांनी आपल्यावरील आरोप नाकारले. 1 डिसेंबरपासून या प्रकरणी नियमित सुनावणी (Crime) होणार आहे.

2 सप्टेंबर 2020 या दिवशी ही घटना घडली होती. मडगावातील युवा सराफ वाळके यांच्या दुकानात शिरून त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. चोरीच्या उद्देशाने हा सशस्त्र दरोडा घातल्याचा पोलिसांचा दावा असून या प्रकरणी सध्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश चोलू गावस यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. दरम्यान या प्रकरणातील सहावा संशयित कुंदन कुमार हा सुनावणीस गैरहजर राहिल्याने त्याच्या विरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

या प्रकरणी मुस्तफा शेख, ओंकार पाटील आणि इव्हेंडर रोड्रिग्स यांच्या विरोधात भादंसंच्या 302 (हत्या), 398 (सशस्त्र दरोडा), 201 (पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न) व 120 ब (गुन्हेगारी कट कारस्थान) तसेच शस्त्र प्रतिबंधक 3 व 25 कलमाखाली आरोप निश्चित करण्यात आले. तर सनी कुमार, राहुल कुमार या दोन बिहारी संशयितावर हा गुन्हा करण्यासाठी शस्त्र पुरविण्याचा आरोप निश्चित केला.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की मुस्तफा, ओंकार आणि इव्हेंडर या तिघांनी वाळके यांच्या मालकीच्या सराफी दुकानात जाऊन दरोडा घालण्याचा कट रचला त्यानुसार 2 सप्टेंबर रोजी संशयित गाडी घेऊन मडगावात आले. त्यापैकी मुश्ताफा दुकानात शिरून त्याने स्वप्निलवर गोळी झाडली. यावेळी स्वप्नीलने प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला. मात्र रक्तस्राव सुरू झाल्याने त्याचे निधन झाले.

या प्रकरणी जे पिस्तुल वापरण्यात आले होते ते बिहारमध्ये जाऊन आरोपींनी विकत आणले होते. तपास करणाऱ्या क्राईम ब्रँचने हे पिस्तुल पुरविणाऱ्या तिघांना अटक केली होती. या प्रकरणी क्राईम ब्रँचने 1200 पेक्षा अधिक मुद्देमालाची यादी जोडणारे आरोपपत्र याआधी सादर केले असून 111 साक्षीदारांची यादी बरोबर जोडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT