54th IFFI Goa: Muralidharan Dainik Gomantak
गोवा

54th IFFI Goa: मुरलीधरन खेळपट्टीवरून थेट रेड कार्पेटवर

54th IFFI Goa: इफ्फीत ठरला आकर्षण: संवाद सत्रात उलगडला क्रिकेट प्रवास; चित्रपटाचे केले प्रमोशन

दैनिक गोमन्तक

54th IFFI Goa: नव्वदीच्या दशकात क्रिकेटची खेळपट्टी गाजवणारा श्रीलंकेचा फिरकीपटू आज इफ्फीच्या रेड कार्पेटवर उतरला. मुरलीधरनला पाहताच अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. कारण तो खेळाडू म्हणून नव्हे, तर स्वत:वरील बायोपिकचे प्रमोशन करण्यासाठी गोव्यात आला होता. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली.

मुरलीधरन म्हणाला, माझा बायोपिक बनवताना जीवनातील घटना खऱ्या असाव्यात आणि अतिशयोक्ती नसाव्यात, असा माझा कटाक्ष होता.

‘अ लिजेंडरी 800 अगेन्स्ट आॅल आॅडस्’ या बायोपिकमधून लोकांना माझी कथा कळेल. कला अकादमी येथे एका संवाद सत्रात मुरलीधरनने क्रिकेट प्रवासातील अनुभव सांगितले. यावेळी अभिनेता मधुर मित्तल, दिग्दर्शक श्रीपथी एम. उपस्थित होते.

तो म्हणाला की, माझ्या लहानपणी 1978 मध्ये घरात टेलिव्हिजन नव्हते. ते दिवस जास्त मजेशीर होते. आम्ही खेळ खेळायचो, मित्रांशी संवाद साधायचो. माझी मुलेही मैदानी

खेळांसाठी फारशी उत्सुक नसतात, असे माझे निरीक्षण आहे.

मुरलीधरन म्हणाले, की श्रीलंकेसाठी ही कठीण वेळ आहे. माझ्याप्रमाणेच इतर क्रिकेटपटूंनाही माझ्या देशात त्रास सहन करावा लागला. कारण ही परिस्थिती अनिश्चित होती. श्रीलंकेच्या लोकांनी गेल्या ४० वर्षांपासून कठीण काळाचा सामना केला आहे, त्यांच्यासाठी क्रिकेट हे एकमेव मनोरंजन आहे.

गरजूंना मदतीसाठी मी श्रीलंकेत एक फाउंडेशन स्थापन केले आहे. दरवर्षी ५० हजार लोकांना पाठिंबा मिळेल. भारत आणि इतर परदेशी क्रिकेटपटूंनी माझ्या फाऊंडेशनला पाठिंबा दिला आणि त्यामुळे मी मदत करू शकलो. मुरलीधरन म्हणाला की, २०१८ मध्ये काही निर्मात्यांनी माझ्याशी संपर्क साधला. लोक मला आतून ओळखत नव्हते, फक्त क्रिकेटर म्हणून ओळखतात. माझे आजोबा तामिळनाडूचे होते. ज्यांना ब्रिटिशांनी चहाच्या मळ्यात कामासाठी नेले होते.

दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या

पाकिस्तानात क्रिकेट दौऱ्यावर असताना एकदा बस दहशतवाद्यांच्या तावडीत सापडली आणि श्रीलंकेचे दोन खेळाडू गोळीबारात जखमी झाले. या घटनेत दहशतवादी बाईकवरून सहज पळूनही गेले. अशा स्थितीतून आम्ही गेलो आहोत, अशी आठवण मुरलीधरन याने सांगितली.

बायोपिक करताना आपण एका चित्रपटाच्या स्वरूपाला चिकटून राहू शकत नाही. मुरलीधरनवर बायोपिक बनवणे आव्हानात्मक होते. त्याच्या जीवनात आम्हाला एक कथा सापडली. कथा सांगता येत नसेल, तर गुदमरल्यासारखे होते. त्यातून हा बायोपिक जन्माला आला.
- श्रीपथी एम., चित्रपट दिग्दर्शक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco ATM Scam: एटीएममध्ये पैसे भरणारेच निघाले चोर! खासगी कंपनीच्या 5 कर्मचाऱ्यांनी लंपास केले 14 लाख; वास्कोतील धक्कादायक प्रकाराने खळबळ

Goa Tiger Symbolism: वाघाच्या पुढच्या 2 पायांमध्ये रानडुक्कर, तर मध्ये छोटेखानी सिंह; वागऱ्यागाळ येथील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

Vaibhav Suryavanshi Century: 15 षटकार 11 चौकार...! 32 चेंडूत शतक ठोकत रचला इतिहास, कतारमध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं वादळ VIDEO

Viral Video: भर रस्त्यात काकाची 'दारु पार्टी'! कुणाचीही हटवण्याची हिंमत नाही, व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, "काका ऑन रॉक"

VIDEO: बुमराहच्या तोंडून निघाली शिवी, बावुमाच्या उंचीवर केलेलं वक्तव्य व्हायरल; म्हणाला, 'बौना भी तो है यह...'

SCROLL FOR NEXT