Vasco Construction Gomantak Digital Team
गोवा

Vasco Construction : वास्‍कोत रस्‍त्‍यांची फोडाफोडी!

पालिका कामांच्या प्रतीक्षेत आहेत, अनेक ठिकाणी रस्ते फोडण्याचे काम चालूच आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: पावसाळा जवळ येऊन ठेपला असला तरी वास्कोत मॉन्सूनपूर्व कामांना पाहिजे तसा वेग आलेला नाही. पालिका कामांच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते फोडण्याचे काम चालूच आहे. काही महिन्यांपूर्वीच हॉटमिक्स केलेले रस्तेही फोडण्यात येत आहेत. त्‍यामुळे जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.

मान्सून जवळ आला की कंत्राटी कामगार घेऊन कामे करावी लागतात. पण ते कामगार पुरत नाहीत. कारण आता प्रभागांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रत्येक नगरसेवकाला कामगारांची कमतरता भासते. त्यामुळे प्रत्येक प्रभागात सफाईचा खोळंबा उडतो. कामगार मिळत नसल्याने नगरसेवक, नगराध्यक्षांमध्ये पालिका मंडळाच्या बैठकीत खडाजंगी उडण्याचे प्रकार खूप वेळा घडले आहेत.

दरम्यान, वास्को शहरात पाण्याचा निचरा व्हावा यासाठी गटारांचे बांधकाम चालू आहे. रस्‍त्‍यांचे कामही सुरू आहे. मेस्तवाडा येथील मुख्य नाला सफाईच्या प्रतीक्षेत आहे. ही सर्व मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली नाही तर गटारे पाण्याखाली जाऊन रस्‍त्‍यांवर पाणी साचण्‍याचा धोका आहे.

सफाई कामगारांची कमतरता

अगोदर मे महिन्यापर्यंत मॉन्‍सूनपूर्व कामे पूर्ण व्‍हायची. दहा वर्षांपूर्वी मुरगाव पालिकेचे 20 प्रभाग होते. नंतर त्या प्रभागांचा 25 प्रभागांत विस्तार करण्यात आला. लोकवस्तीही वाढत गेली. मात्र पालिका सफाई कामगारांची संख्या कमी होत गेली. पूर्वी पालिकेकडे दीड हजारांहून अधिक कामगार होते. आता ती संख्या 75 वर आली आहे. पालिकेकडे आता सफाई कामगारांची कमतरता आहे. त्यामुळे वास्को शहराबरोबर प्रत्येक प्रभागात साफसफाईचे तीनतेरा वाजले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT