Mungul Margao Gang War Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचे गँगवॉर गोव्यात पोहोचलं? मुंगूल गँगवॉरबाबत मोठी अपडेट समोर, 'ओमसा'च्या CDR ची पडताळणी सुरू

Lawrence Bishnoi Goa: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणात कुख्यात गँगस्टर बिष्णोई याचा संबंध असल्याचे आतापर्यंतच्या पोलिस तपासात उघड झाले असल्याने या गॅंगवॉरच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा संबंध असल्याचे आतापर्यंतच्या पोलिस तपासात उघड झाले असल्याने या गॅंगवॉरच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

बिष्णोई गँगचा ओमसा हा सध्या फातोर्डा पोलिसांच्या कोठडीत असून, त्याच्या कॉल डिटेल्सची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. तो कुणाच्या संपर्कात होता याची माहिती पोलिस घेत आहेत. दरम्यान, बिष्णोई गँगचा हस्तक पवन सोळंकीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे.

हे प्रकरण आता बिष्णोई गँगशी संबंधित असल्याने पोलिसांनी cबाळगली आहे. देशातील अन्य राज्यातील पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर दिली.

पोलिसांच्या हाती इंस्ट्रग्रामवर अपलोड झालेले काही व्हिडिओ लागले आहेत. त्यातून मुंगूल गॅंगवॉरची सुपारी बिष्णोई गँगने घेतली होती, असे उघड होऊ लागले आहे.

गोव्यात गुन्हेगारी विश्वात आपले वर्चस्व ठेवण्यासाठी हे गॅंगवॉर झाले होते. १२ ऑगस्ट रोजी गॅंगवॉरची ही घटना घडली होती. हा सर्व पूर्वनियोजित कट होता.

वॉल्टर गॅंगचे यवकेश सिंग व रफिक तशान या दोघांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले होते.

या प्रकरणात पोलिस सध्या अमोघ नाईक व वेली या दोघांच्या शोधात आहे. त्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण सोक्षमोक्ष लागणार आहे, आतापर्यंत या टोळीयुद्धात २३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT