Mungul Gang War Dainik Gomantak
गोवा

Mungul Crime: मुंगूल गँगवॉरप्रकरणी नवी अपडेट! अन्य 11 संशयितांचा जामिनासाठी अर्ज; नायायालयात होणार सुनावणी

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉर प्रकरणी अन्य अकरा संशयितांनी जामिनासाठी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर मंगळवारी (ता.२३) सुनावणी होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मुंगूल गँगवॉर प्रकरणी अन्य अकरा संशयितांनी जामिनासाठी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात अर्ज केला असून, त्यावर मंगळवारी (ता.२३) सुनावणी होणार आहे.

अमोघ नाईक, मोहम्मद ताहिर खान, विल्सन कार्व्हालो, मालिक शेख , मंदार प्रभू, सूरज बोरकर, ओमप्रकाश मेघवाल, प्रकाश कारबार, सूरज मांझी, शाहरुख शेख व इम्रान बेपारी अशी अर्ज केलेल्यांची नावे आहेत.

गेल्या आठवड्यात न्यायालयाने याच गँगवॉर प्रकरणी व्हॅली डिकॉस्टा, अमर कुलाल, वासु कुमार, मोहन अली, ज्योयस्टन फर्नांडिस, सुनील बिलावर, बाशा शेख, गौरांग कोरगावकर, राजेश वेल्मा, प्रकाश वेल्मा, अविनाश गुंजीकर, धनंजय तलवार, अक्षय तलवार या १३ जणांना सशर्त जामीन मंजूर केला होता. तसेच दिपक कट्टीमणी व परशुराम राठोड या दोघांना पूर्वीच जामीन मंजूर झाला होता.

मुंगुल येथे १२ ऑगस्टला गँगवॉरची घटना घडली होती. एकूण २८ जणांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली होती. त्यातील व्हॅली व वोल्टर यांच्या गँगच्या संघर्षातून हे टोळीयुद्ध झाले होते. यात युवकेश सिंग व रफिक तैशान हे दोघे गंभीर जखमी झाले होते. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा या  गँगवॉर प्रकरणी सहभाग असल्याचे तपासात आढळून आल्याने या घटनेचे गूढ वाढले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT