Mungul Gang War
Mungul Gang WarDainik Gomantak

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर; 13 जणांच्या जामिनावर मंगळवारी होणार सुनावणी

Goa Mungul Gang War: मुंगूल गँगवॉर प्रकरणी न्यायालयात जामिनासाठी धाव घेतलेल्या १३ जणांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता.१६) सुनावणी होणार आहे.
Published on

मडगाव: मुंगूल गँगवॉर प्रकरणी न्यायालयात जामिनासाठी धाव घेतलेल्या १३ जणांच्या जामीन अर्जावर मंगळवारी (ता.१६) सुनावणी होणार आहे.

दक्षिण गोवा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात या जामीन अर्ज सुनावणीस आला असता वरील तारीख देण्यात आली.

व्हॅली डिकॉस्टा, अमर कुलाल, वासु कुमार, मोहन अली, ज्योयस्टन फर्नांडिस, सुनील बिलावर, बाशा शेख, गौरांग कोरगावकर, राजेश वेल्मा, प्रकाश वेल्मा, अविनाश गुंजीकर, धनंजय तलवार व अक्षय तलवार या तिघांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.

Mungul Gang War
Goa Fire Incidents: एकाच दिवशी सहा ठिकाणी आग, गवत पेटण्याचे प्रमाण वाढले; आगरवाड्यात अनर्थ टळला

दरम्यान, मुंगुल येथे १२ ऑगस्टला गँगवॉरची घटना घडली होती. एकूण २८ जणांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली होती.

त्यातील दीपक कट्टीमणी व परशुराम राठोड या दोघांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला तर अन्य संशयित न्यायालयीन कोठडीत आहे. व्हॅली व वोल्टर यांच्या गँगच्या संघर्षातून हे टोळीयुद्ध झाले होते. यात युवकेश सिंग व रफिक तैशान हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com