Mungul Gang War Dainik Gomantak
गोवा

Mungul Crime: मुंगुल गँगवॉरमधील अनेकजण भूमीगत! मटका एजंटचा सहभाग उघड; पोलिसांना सापडले महत्त्वाचे धागेदोरे

Mungul Gangwar: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचे कनेक्शन उघड झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून या गॅंगवॉरात सहभागी झालेले अनेकजण आता भूमीगत झाले आहेत.

Sameer Panditrao

मडगाव: मुंगुल टोळीयुद्ध प्रकरणात एका मटका एजंटाचाही सहभाग होता, असे आता उघड झाले आहे. राजेश हेलमा असे त्याचे नाव असून त्याची बोलेनो कार पोलिसांनी जप्त केली आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचे कनेक्शन उघड झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून या गॅंगवॉरात  सहभागी झालेले अनेकजण  आता भूमीगत झाले आहेत.  

१२ ऑगस्ट रोजी टोळी युद्धाची ही घटना घडली होती. हा सर्व पूर्वनियोजित कट होता. वॉल्टर गॅंगचे युवकेश सिंग व रफिक तशान या दोघांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले होते.  

बिष्णोई गँगचा ओमसा याला पोलिसांनी अटक केली आहे तर पवन सोळंकी याच्या मागावर पोलिस आहेत. पोलिस सध्या ओमसाच्या मोबाईल कॉलची पडताळणी करीत असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना सापडले आहेत. 

हेलमा हा मूळ आंध्र प्रदेशातील असून तो नेसाय येथे राहतो. तो वेल्ली गँगचा सदस्य आहे. वेल्ली ही अजून फरार आहे. आतापर्यंत फातोर्डा पोलिसांनी या प्रकरणी २३ जणांना अटक केली असून यातील दीपक कट्टमणी याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. 

दोघांचे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

दरम्यान, पोलिस शोधात असलेला अमोघ नाईक हा अजूनही फरार असून त्याने अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. हेलमा यानेही न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT