court  Dainik Gomantak
गोवा

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Mungul Gang War Case: मुंगूल गँगवॉरप्रकरणी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतलेल्या दहा जणांच्या अर्जावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाले.

Manish Jadhav

मडगाव: मुंगूल गँगवॉरप्रकरणी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतलेल्या दहा जणांच्या अर्जावर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद पूर्ण झाले. शुक्रवारी (12 डिसेंबर) न्यायालय आपला निकाल देणार आहे. 

दक्षिण गोवा सत्र न्यायालयाचे (Court) न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. संशयितांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तर या प्रकरणातील संशयित गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने त्यांना जामीन मिळाल्यास ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. 

व्हॅली डिकॉस्टा, अमर कुलाल, वासु कुमार, मोहन अली, ज्यॉयस्टन फर्नांडिस, सुनील बिलावर, बाशा शेख, गौरांग कोरगावकर, राजेश वेल्मा, प्रकाश वेल्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. शिवाय अविनाश गुंजीकर, धनंजय तलवार, अक्षय तलवार या तिघांनी जामिनासाठी अर्ज केला असून 12 डिसेंबरला त्यावर युक्तिवाद होणार आहे.

मुंगूल येथे 12 ऑगस्टला टोळीयुद्ध झाले होते. या प्रकरणात एकूण 28 जणांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली होती. त्यातील दीपक कट्टीमणी आणि परशुराम राठोड या दोघांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे, तर अन्य संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. व्हॅली आणि वोल्टर यांच्या गँगच्या संघर्षातून हे टोळीयुद्ध झाले होते. यात युवकेश सिंग आणि रफिक तैशान हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

SCROLL FOR NEXT